इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंचे संघ बदलण्याची शक्यता आहे. फ्रँचायझी देखील खेळाडूंना सोडतील आणि ठेवतील. दरम्यान रोहित शर्माबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. रोहितला मुंबई इंडियन्सने सोडले तर त्याला मेगा ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळू शकते. लखनऊ सुपर जायंट्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी रोड्स यांनी रोहितबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रोड्सने रोहितचे कौतुक केले आणि प्रत्येक संघाला त्याला घ्यायला आवडेल असे सांगितले.
न्यूज 24 च्या बातमीनुसार, रोड्स म्हणाला, “रोहित शर्माकडे खूप अनुभव आहे आणि त्याने अनेक विजेतेपदे जिंकली आहेत. जर रोहित शर्मा लिलावात आला तर लखनऊ त्याचे स्वागत करण्यास तयार आहे. तो इतका महान खेळाडू आहे, प्रत्येक संघ त्याला आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या कर्णधार बदलाबाबत मी भाष्य करू शकत नाही. पण रोहितला कुठेतरी जायचं असेल तर मुंबई सहजासहजी सोडणार नाही. मी रोहित आणि मुंबईसोबत काम केले आहे. तो दबाव परिस्थिती सहजपणे हाताळतो आणि खूप शांत राहतो.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते. फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकले असून त्याला याआधी याची माहिती देण्यात आली नव्हती. परिणामी रोहितसोबतच त्याचे चाहतेही संतापले होते. आता आयपीएल 2025 पूर्वी तो संघ सोडू शकतो अशी अफवा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लखनऊबद्दल बोलायचे झाले तर या संघात अनेक बदल होऊ शकतात. नुकतेच संघाचे मालक संजीव गोयंका यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी झहीर खानला मेंटाॅर म्हणून निवडले आहे. पत्रकार परिषदेत गोयंका यांना केएल राहुलबद्दल विचारण्यात आले. राहुल हे कुटुंबासारखे असल्याचे उत्तर त्यांनी दिले. पण त्याला कर्णधार ठेवण्याच्या प्रश्नावर गोयंका म्हणाले होते की, या निर्णयासाठी अजून बराच वेळ आहे.
हेही वाचा-
चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, या मोसमात खेळणार शेवटचा सामना
जो रूटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण…! अशी कामगिरी करणारा कितवा खेळाडू?
ENG vs SL: जो रूटची तोडफोड कामगिरी सुरूच, शतकं ठोकून रचला इतिहास