इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये रविवारी (दि. १० एप्रिल) डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. यातील दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता नाणेफेक झाली. यावेळी लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली असून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
लखनऊ संघात २ बदल झाले आहेत. एविन लुईस आणि टायमल मिल्स संघातून बाहेर पडले आहेत, तर मार्कस स्टॉयनिस आणि दुष्मंथा चमीराची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे राजस्थान संघातही २ बदल झाले आहेत. नवदीप सैनीच्या जागी कुलदीप सेन याची एन्ट्री झाली आहे. तसेच, यशस्वी जयस्वालची जागा रस्सी व्हॅन डर दुसेनने घेतली आहे.
???? Toss Update from Wankhede ????
@klrahul11 has won the toss & @LucknowIPL have elected to bowl against @rajasthanroyals.
Follow the match ???? https://t.co/8itDSZ2mu7#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/Y5DrP9eILK
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
या सामन्यापूर्वी राजस्थानने या हंगामात ३ सामने खेळले. त्यातील २ सामन्यात विजय, तर १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे लखनऊने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यातील ३ सामन्यात विजय, तर १ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवत गुणतालिकेतील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.
असे आहेत ११ जणांचे संघ
राजस्थान रॉयल्स- जोस बटलर, रस्सी व्हॅन डर दुसेन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक) शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि युझवेंद्र चहल.
लखनऊ सुपर जायंट्स- केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई आणि आवेश खान.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराट कोहली खरंच बाद होता का? जाणून घ्या काय सांगतो क्रिकेटमधील ‘हा’ नियम
किती आले, किती गेले; पण दिल्लीकडून सेहवागनंतर फक्त पृथ्वी शॉच करू शकला ‘हा’ भीमपराक्रम
रियान परागला घाबरला राजस्थान रॉयल्सचा परदेशी खेळाडू, केली थेट निवृत्तीची घोषणा!






