पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये शनिवारी (दि. ०९ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. आयपीएल २०२२ हंगामाचा हा १८ सामना होता. यामध्ये आरसीबीने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यात खूपच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. विराट तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केल्यामुळे नाराज झाल्याचे दिसला.
सामन्यात आरसीबी जेव्हा विजयाच्या दिशेने पुढे चालला होता आणि विराट कोहली (Virat Kohli) त्याचे आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील पहिले अर्धशतक करणार होता. अशातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने युवा डेवाल्ड ब्रेविसच्या हातात चेंडू सोपवला आणि त्याने विराटला एलबीडब्ल्यू बाद केले. विराटही क्षणाचा विलंब न करता बॅट दाखवली आणि डीआरएस घेतला. विराटला आत्मविश्वास होता की, तो बाद नाहीये. विराटच्या मते चेंडू बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागला आहे आणि अशात तो बाद असू शकत नाही,. पण असे झाले नाही. तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केले.
तिसऱ्या पंचांनी अनेकदा रिव्ह्यू पाहिला आणि नंतर निर्णय दिला की, चेंडू एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागला आहे आणि अशात तो मैदानातील पंचांच्या निर्णयानुसार बाद असेल. मेरिलबोन क्रिकेट क्लबद्वारे (MCA) बनवल्या गेलेल्या नियमांनुसार विराट बाद नव्हता. आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एमसीसीने बनवलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाते. नियमांनुसार चेंडू जर एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागला असेल, तर तो बॅटला लागल्याचे मानले जाते.
Wasim Jaffer (on Virat Kohli 's Wicket ) :- That was not out .@imVkohli • #ViratKohli???? pic.twitter.com/O51qt2Ciel
— Virat Kohli Fan Club (@ImV_kohli_Fan) April 10, 2022
नियम ३६.२.२ नुसार जर चेंडू स्ट्राईकवर फलंदाजी करत असलेल्या खेळाडूच्या शरीराला आणि बॅटला एकाच वेळी लागला, तर तो बॅटला आधी लागला, असे मानले जाते. एमसीसीच्या या नियमानुसार विचार केला, तर विराट कोहली नक्कीच नाबाद होता. परंतु तिसऱ्या पंचांनी तसे केले नाही. याच पार्श्वभूमीवर मैदानात विराटचा पारा चढल्याचे दिसत होते. विराटने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात ३६ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. आरसीबीला मिळालेल्या विजयात त्याचे महत्वाचे योगदान होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: वॉर्नरने ओळखलीय भारतीय चाहत्यांची नस? ‘पुष्पा’ सिनेमातील हुक स्टेप करत जिंकली लाखो मने
Video: चाहत्याची थेट मैदानात एन्ट्री, मग काय रोहितने दिली हवाई मिठी; विराटचेही जिंकले मन