आयपीएल 2025 चे वारे आता वाहू लागले आहेत. आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक संघांच्या खेळाडूंमध्ये आणि कोचिंग स्टाफमध्येही बदल दिसू शकतात. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ सुपर जायंट्सची टीम एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्याबाबत विचार करत आहे. रिपोर्टनुसार, भारताच्या या माजी फलंदाजाला लखनऊच्या कोचिंग स्टाफमध्ये संधी दिली जाऊ शकते.
एनसीएमध्ये राहुल द्रविडच्या जागी आलेल्या लक्ष्मण यांचा या वर्षी सप्टेंबरपर्यंत करार आहे. ते आपला करार वाढवण्याचा विचारात नसल्याचं समजतं. अशा परिस्थितीत लक्ष्मण नव्या भूमिकेच्या शोधात आहेत. लखनऊ सुपर जायंट्स याचा फायदा घेऊन त्यांना आपल्या कोचिंग स्टाफमध्ये शामील करून घेण्याच्या विचारात आहे.
टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कसोटी फलंदाजांपैकी एक असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी यापूर्वीही आयपीएलमध्ये काम केलं आहे. ते काही वर्ष सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शक होते. तर 2008 च्या आयपीएल हंगामात ते हैदराबाद फ्रँचायझीसाठी खेळले आहेत. लक्ष्मण यांना देशांतर्गत क्रिकेट आणि युवा खेळाडूंची चांगली जाण आहे. अशा स्थितीत लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्या आगमनाचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
लखनऊ फ्रँचाईजी 2022 मध्ये अस्तित्वात आली होती. तेव्हापासून केएल राहुल संघाचा कर्णधार आहे. परंतु आता आगामी हंगामात संघात बदल पाहायला मिळू शकतो. लखनऊ सुपर जायंट्स कर्णधारपदासाठी इतर पर्यायांचा विचार करत असल्याची माहिती आहे. त्याचवेळी राहुलही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या आहेत. त्याला तेथे कर्णधारपदही मिळू शकतं. मात्र यावर अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलं गेलेलं नाही. आता भविष्यात हे वृत्त खरं ठरतं की नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शेवटच्या सामन्यात शतक…तरीही संजू सॅमसनला संघातून का वगळलं?
आयपीएल 2025 पूर्वी केएल राहुल परतणार RCBच्या ताफ्यात?
“रोहित माझ्याविरुद्ध फलंदाजीला घाबरतो, विराट आऊट झाल्यावर चिडतो”; दिग्गज गोलंदाजानं घेतली मजा