इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाचा ७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सूपर जायंट्स या दोन संघामध्ये पार पडला. हा सामना केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सने ६ विकेट्सने जिंकला. लखनऊ संघाला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने पराभूत केले होते. त्यानंतर लखनऊसाठी चेन्नईविरुद्धचा विजय हा पहिलाच विजय ठरला. त्यामुळे लखनऊ संघातील खेळाडूंनी या विजयाचे मोठे सेलिब्रिशन केले.
लखनऊ संघातील खेळाडूंनी प्रसिद्ध गाणे ‘स्वीट कॅरोलियन’ एकसाथ गात आनंद साजरा केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लखनऊ फ्रॅंचायझीने (Lucknow Super Giants) आपल्या अधिकृत आकाऊंटवरुन खेळाडूंचा हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ‘थेट लॉकर रूममधून या विजयाच्या भावना, संघाने पहिला विजय मिळाला आहे.’ यावेळी संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर देखील उपस्थित होता आणि खूप आनंदी दिसत होता.
या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक लाइक्स आल्या आहेत, तसेच जवळ-जवळ एक हजार कमेंट आल्या आहेत. चाहत्यांनी सुद्धा खेळाडूंच्या या कृत्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
https://www.instagram.com/reel/CbyBx9BtWXF
आपल्या पहिल्या सामन्यात लखनऊ संघाला गुजरातने ५ विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यातील पराभवानंतर संघाने दूसऱ्या सामन्यात चांगले पुनरागमन करुन ४ वेळा आयपीएलची ट्राॅफी जिंकलेल्या सीएसकेला पराभूत केले.
पहिल्यांदा फलंदाजी करताना सीएसकेने २० षटकात ७ विकेट्स गमावत २१० धावा केल्या होत्या. रॉबिन उथप्पा, शिवम दुबे आणि मोईन अली यांनी लखनऊच्या गोलंदाजांना त्रासून सोडले होते. प्रत्युत्तरात लखनऊकडून क्विंटन डी कॉक आणि एव्हिन लुईस यांच्या जलद खेळीने लखनऊला पहिला विजय मिळवून दिला. सीएसकेचा हा या हंगामातील सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात सीएसकेला कोलकाता नाईट रायडर्स संघाने पराभूत केले होते.
लखनऊ संघ आता पुढील सामना 4 एप्रिल रोजी सनरायझर्सविरुद्ध खेळाणार आहे, तर सीएसके संघ पुढील सामना पंजाबविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रसलच्या तुफानी खेळीचं किंगखानकडून कौतुक! म्हणाला, ‘चेंडू एवढा उंच उडताना…’
…म्हणून विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची ट्रॉफी परत लंडनला पाठविण्यात आली