---Advertisement---

IPL 2025; लखनऊ केएल राहुलला रिलीज करणार? मोठे अपडेट समोर

On: गुरूवार, ऑक्टोबर 17, 2024 10:37 PM
---Advertisement---

आयपीएल (Indian Premier League) 2025च्या मेगा लिलावाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेगा लिलाव (Mega Auction) आयोजित केला जाऊ शकतो. तत्पूर्वी अशा खेळाडूंची नावे समोर आली आहेत ज्यांना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) लिलावापूर्वी कायम ठेवू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लखनऊ आपला कर्णधार केएल राहुलला (KL Rshul) संघात कायम ठेवणार की नाही? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार लखनऊ फ्रँचायझी 2 अनकॅप्ड खेळाडूंना संघात कायम ठेवेल, ज्यामध्ये मोहसीन खान आणि आयुष बदोनी या 2 खेळाडूंचा समावेश आहे. फ्रँचायझी या दोघांना प्रत्येकी 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवू शकते. पण निकोलस पुरनला टिकवण्यासाठी फ्रँचायझी किती पैसे खर्च करते हे पाहणे देखील उत्सुकतेचं ठरेल.

राहुल हा आयपीएल 2022 पासून लखनऊ फ्रँचायझीचा एक भाग आहे. लखनऊने त्याला 17 कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात सामील केले होते. शेवटच्या 3 हंगामात तो कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ 2 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, शेवटच्या हंगामात संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. त्यामुळे संघ मालक संजीव गोयंका आणि राहुल यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला होता. त्यामुळे राहुलला संघात कायम ठेवणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

केएल राहुलने (KL Rahul) शेवटच्या आयपीएल हंगामात लखनऊसाठी 14 सामने खेळले. त्यामध्ये त्याने 37.14च्या सरासरीने 520 धावा केल्या. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 136.03 राहिला, तर सर्वोच्च धावसंख्या 82 राहिली. शेवटच्या हंगामात त्याने 4 अर्धशतकही झळकावली.

महत्त्वाच्या बातम्या-

चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये जाणार? विदेशी मंत्रालयाचे मोठे वक्तव्य!
IND vs NZ; वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूकडे संघाची धुरा
IND vs NZ; 46 धावात सर्वबाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “आमचा निर्णय चुकीचा…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---