---Advertisement---

IPL 2025: केएल राहुलची होणार सुट्टी? लखनऊला मिळणार नवा कर्णधार?

On: सोमवार, सप्टेंबर 9, 2024 8:59 PM
---Advertisement---

आगामी आयपीएलचा 18वा हंगाम 2025 मध्ये खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. त्यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलताना दिसणार आहेत. काही संघांचे कर्णधार देखील आगामी हंगामात बदलताना दिसणार आहेत. तत्पूर्वी शेवटच्या आयपीएल हंगामात जेव्हा लखनऊ सुपर जायंट्स (LSG) प्ले-ऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. त्यावेळी लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका राहुलवर राग काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

दरम्यान, आगामी हंगामापूर्वी चाहत्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) मध्ये सहभागी होण्यासाठी दुलीप ट्राॅफी (Duleep Trophy) सामन्यात केएल राहुलसाठी (KL Rahul) मैदानात जोरदार घोषणाबाजी केली. आता असा दावा केला जात आहे की राहुल लखनऊ सोडणार आहे.

केएल राहुलने (KL Rahul) लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सोडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. राहुल आणि एलएसजी फ्रँचायझीकडून याची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. काही आठवड्यापूर्वी जेव्हा राहुल लखनऊ संघ सोडत असल्याच्या अफवा शिगेला पोहोचल्या होत्या, तेव्हा एका मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले होते की, संजीव गोयंका यांनी या अफवांवर वक्तव्य देण्यास नकार दिला होता.

परंतु, त्यांनी राहुलला कुटुंबाचा एक भाग म्हटले होते. काही आठवड्यांपूर्वी, पीटीआयने एक रिपोर्ट्स टाकला होता. ज्यामध्ये राहुलला एलएसजीने कायम ठेवण्याची आशा व्यक्त केली होती. राहुलच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 132 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 45.47च्या सरासरीने 4,683 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 37 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 132 आहे. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 134.61 राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूपासून भारताला राहावे लागणार सावध! भारताविरूद्ध धमाकेदार आकडेवारी
श्रीलंकेने रचला इतिहास, 10 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जिंकली कसोटी; निसांका विजयाचा शिल्पकार
दमदार प्रदर्शन करूनही बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत ‘या’ 5 खेळाडूंचा पत्ता कट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---