---Advertisement---

दमदार प्रदर्शन करूनही बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत ‘या’ 5 खेळाडूंचा पत्ता कट

On: सोमवार, सप्टेंबर 9, 2024 7:17 PM
Team-India-Test
---Advertisement---

भारतीय संघ आगामी बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (8 सप्टेंबर) रोजी जाहीर झाला आहे. पण निवड समितीने नेमलेल्या खेळाडूंवर चाहते नाराज झाल्याचे दिसत आहे. कारण काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करूनही त्यांची संघात निवड करण्यात आली नाही. या बातमीद्वारे आपण अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

1) रूतुराज गायकवाड- भारताच्या सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रूतुराज गायकवाडलाही (Ruturaj Gaikwad) भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही. गायकवाडचा संघात समावेश होण्याच्या पूर्ण अपेक्षा होत्या. पण तसे झाले नाही. त्यामुळे चाहते नाराज झाले आहे.

2) श्रेयस अय्यर- श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) काही दिवसांपूर्वी भारतीय संघात परतला आहे. अय्यर सध्या दुलीप ट्रॉफी खेळत आहे. अय्यरने या स्पर्धेत अर्धशतक झळकावले आहे. पण बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अय्यरची निवड झाली नाही.

मुकेश कुमार- मुकेश कुमार (Mukesh Kumar) हा काही दिवसांपासून भारतीय संघाचा भाग आहे. मुकेशने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातही 5 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्याच्या चमकदार कामगिरीनंतरही मुकेशला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.

मुशीर खान- सरफराज खानचा भाऊ मुशीर खानने (Musheer Khan) दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात 181 धावांची शानदार खेळी खेळली. त्याची खेळी पाहता त्याची भारतीय संघात निवड होऊ शकते, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही आणि त्याला संधी मिळाली नाही.

देवदत्त पडिकल- पडिकलने अलीकडेच संयम दाखवला आणि दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार अर्धशतक झळकावले. पडिकलला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो अधिक चांगली कामगिरी करतो पण त्याची कामगिरी चांगली असूनही त्याची भारतीय संघात निवड झाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

सुरक्षा घेरा तोडून आझमला भेटायला पोहोचला चाहता, त्यानंतर रौफने असे काही करत जिंकली मनं
भारतीय क्रिकेटर, ज्यांच्यावर बनला सिनेमा; एकाने 200 कोटींहून अधिक कमाई केली
रोहितच्या ‘त्या’ स्वभावाचा रिषभ पंतला होतो त्रास! म्हणाला, “मैदानात ठीक आहे पण मैदानाबाहेर…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---