लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर मार्कस स्टॉयनिसने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मुंबईविरुद्धच्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने निर्धारित 20 षटकांमध्ये 3 बाद 177 धावा केल्या. स्टॉयनिसने लखनऊच्या डावातील 18व्या षटकात तब्बल 24 धावा खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या उंचावली. शेवटच्या तीन षटकांमध्ये लखनऊने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदा ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) याने लखनऊच्या डावातील 18वे षटक टाकले. जॉर्डनने या डावात तब्बल 24 धावा खर्च केल्या. षटकातील सर्व चेंडू मार्क स्टॉयनिस (Marcus Stoinis) याने खेळले, पहिल्या चेंडूवर षटकार दिला, तर दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर लागोपाठ दोन षटकार जॉर्डनने दिले. त्याने षटकातील पाचव्या चेंडूवर जॉर्डनने पुन्हा एकदा षटकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक चौकार ठोकला. स्टॉयनिसने या सामन्यात एकूण 47 चेंडू खेळले आणि 89 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 8 षटकार कुटले.
लखनऊच्या डावातील 18व्या षटकात जॉर्डनने 24 धावा दिल्यानंतर पुढची दोन षटकेही लखनऊसाठी धावा देणारीच ठरली. 19 आणि 20व्या षटकात लखनऊला प्रत्येकी 15-15 विकेट्स मिळाल्या. म्हणजेच शेवटच्या तीन षटकांमध्ये लखनऊने एकूण 54 धावा कुटल्या. स्टॉयनिसव्यतिरिक्त लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या यानेही 42 चेंडूत 49 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. दुखापतीमुळे कृणाल पंड्या रिटायर्ड हर्ट झाला. मुंबईला विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले. (Lucknow Super Giants put up a huge score due to Marcus Stoinis’ storming innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जॉर्डनच्या चेंडूवर डी कॉकने दाखवली ताकद, एका हाताने षटकार मारताच नावावर झाला मोठा विक्रम
तब्बल 10 वर्षांनंतर मुंबईसाठी पीयुष चावलाला जमली ‘अशी’ कामगिरी, आधी भज्जीने केलेला पराक्रम; वाचाच