पहिला क्वालिफायर सामना पार पडल्यानंतर बुधवारी (दि. 24 मे) आयपीएल 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी डावातील पहिली दोन षटके टाकल्यानंतर लखनऊ संघाने जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला. याव्यतिरिक्त त्यांच्या नावावर हंगामातील दोन विक्रमांचीही नोंद आहे. काय आहेत ते विक्रम चला जाणून घेऊयात…
डावाची सुरुवात फिरकीपटूंकडून
चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने जबरदस्त विक्रम नावावर केला. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ईशान किशन आणि रोहित शर्मा मैदानात उतरले होते. यावेळी लखनऊकडून गोलंदाजी करण्यासाठी कर्णधार कृणाल पंड्या (Krunal Pandya) आला होता. या षटकात त्याने 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर डावातील दुसरे षटक कृष्णप्पा गौथम याने टाकले. या षटकात त्याने 8 धावा खर्च केल्या. कृणाल आणि कृष्णप्पा यांनी पहिली दोन षटके टाकताच लखनऊच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
लखनऊ हा आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत डावाची पहिली दोन षटके फिरकीपटूंना टाकायला सांगणारा पहिलाच संघ बनला. साखळी फेरी आणि पहिल्या क्वालिफायर अशा 71 सामन्यांमध्ये कोणत्याच संघाने डावाच्या सुरुवातीची दोन षटके फिरकीपटूंच्या हातून टाकली नव्हती. मात्र, लखनऊने हा कारनामा करून दाखवला.
लखनऊचे मुंबईविरुद्ध पारडे जड
याव्यतिरिक्त आयपीएल स्पर्धेत लखनऊ विरुद्ध मुंबई संघ आतापर्यंत 3 वेळा आमने-सामने आले. या तिन्ही सामन्यात मुंबईने लखनऊपुढे नांग्या टाकल्या. तिन्ही सामने लखनऊने आपल्या नावावर केले. त्यामुळे आता एलिमिनेटर सामन्यात मुंबई संघ मागील पराभवाचा बदला घेतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अव्वल 10 गोलंदाज-फलंदाजांमध्ये खेळाडू नसताना प्ले-ऑफमध्ये एन्ट्री
विशेष म्हणजे, लखनऊ सुपर जायंट्स संघाचे खेळाडू हे हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अव्वल 10 खेळाडूंमध्ये सामील नाहीयेत. मात्र, तरीही लखनऊने आयपीएल 2023 स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये एन्ट्री करण्याचा मान मिळवून दाखवला.
आता एलिमिनेटर सामना जिंकून कोणता संघ गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना (Second Qualifier Match) खेळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Lucknow Super Giants record in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अटीतटीच्या सामन्यात टॉस जिंकून मुंबईचा बॅटिंगचा निर्णय, लखनऊपुढे ठेवणार का मोठे आव्हान?
मैदानावर जल्लोष, तर लिफ्टमध्ये डान्स! CSKने फायनल गाठताच युवा खेळाडूंसोबत थिरकला ब्रावो, Video पाहाच