आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 16 वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला जात आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि लखनऊला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. आता लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 203 धावा केल्या आहेत. तसेच मुंबईला जिंकण्यासाठी 204 धावांचं आव्हान दिलेल आहे.
लखनऊसाठी प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक धावा मिचेल मार्शने केल्या. त्याने 31 चेंडूत 60 धावा केल्या. ज्यामध्ये 9 चौकार, 2 षटकार झळकावले. तसेच एडन मारक्रमने 38 चेंडूत 53 धावा केल्या. बडोनीने 19 चेंडूत 30 धावा केल्या तर डेविड मिलर 14 चेंडूत 27 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आजही 2 धावांवरच परत गेला.
मुंबईसाठी सर्वाधिक शानदार गोलंदाजी हार्दिक पांड्याने केली त्याने 4 षटकात 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश यांनी एक- एक विकेट्स घेतल्या.
मुंबईसाठी आज रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही त्याला दुखापत झाली त्यामुळे तो खेळू शकणार नाही. अशातच मुंबईच्या संघ आज कसा खेळेल याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. तसेच किती षटकात मुंबई हे लक्ष पूर्ण करेल हे पाहणं देखील रंजकतेच असणार आहे.






