आयपीएल (IPL 2025) पूर्वी लखनऊ सुपर जायंट्समध्ये (LSG) अनेक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, लखनऊ सुपर जायंट्स (LSG) लवकरच पत्रकार परिषद घेऊ शकते. आगामी हंगामाबाबतचे पत्रकार परिषदेत अपडेट्स देण्याची शक्यता आहे. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी नुकतीच केएल राहुलची (KL Rahul) भेट घेतली होती. त्याच्याबाबतही घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
केएल राहुलनं (KL Rahul) लखनऊ सुपर जायंट्सच्या (KL Rahul) कार्यालयात संजीव गोयंका यांची भेट घेतली. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर लखनऊ राहुलला संघात कायम ठेवण्याच्या तयारीत आहे. एक्स अकाउंटवर माहिती शेअर केली गेली आहे की, लखनऊ फ्रँचायझी बुधवारी पत्रकार परिषद घेऊ शकते. राहुलबाबतचे अपडेट्स यामध्ये मिळू शकतात.
शेवटच्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) 14 पैकी 7 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला होता. लखनऊ शेवटच्या हंगामात प्ले-ऑफमध्ये देखील स्थान मिळवू शकला नाही. 14 गुणांसह ते 7व्या स्थानी राहिले. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊचा संघ 3 वर्ष खेळत आहे. शेवटच्या हंगामात संघ मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यामध्ये बाचाबाची पाहायला मिळाली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं की, लखनऊचा संघ आगामी हंगामापूर्वी केएल राहुलला सोडून देऊ शकतो.
केएल राहुलनं (KL Rahul) शेवटच्या हंगामात लखनऊसाठी 14 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 37.14च्या सरासरीनं आणि 136.13च्या स्ट्राईक रेटसह 520 धावा केल्या. दरम्यान त्यानं 4 अर्धशतकंही झळकावली. शेवटच्या हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या 82 राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड…!
एकाच वर्षात झळकावली 9 शतकं! पाकिस्तानी खेळाडूची धमाकेदार कामगिरी
कडवट शेवटानंतरही डेविड वॉर्नरला आली हैदराबादची आठवण, व्यक्त केली खेळण्याची इच्छा?