---Advertisement---

लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्यात एकाना स्टेडियमवर बॉलर्सची अग्निपरिक्षा? खेळपट्टी-हवामान रिपोर्ट्स घ्या जाणून

On: बुधवार, एप्रिल 1, 2026 1:44 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये पाचवा सामना आज (१ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. १९ व्या आयपीएल हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील दोन सामने मोठ्या धावसंख्येचे झाले, तर एक सामना कमी धावसंख्येचा आणि एक १६० पेक्षा अधिक धावसंख्येचा झाला. अशातच एकाना स्टेडियमवर धावांचा पाऊस पडणार की गोलंदाज कमाल करणार हे जाणून घेऊ.

लखनऊ आणि दिल्लीचा हा या हंगामातील पहिलाच सामना आहे. लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचे आतापर्यंत २२ सामने खेळले गेले. त्यामधील पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघाने ९ आणि १२ सामने दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तसेच येथे नाणेफेकीचेही अधिक महत्व आहे.

येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने १४ आणि हरणाऱ्या संघाने ७ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला. लखनऊचे वातावरण संध्याकाळी तापमान २८ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता असल्याने पावसाची काही चिंता नाही. यामुळे चाहत्यांना संपूर्ण षटकांचा सामना पाहायला मिळणार आहे.

एकानावर २०२३ पासून आयपीएलचे सामने खेळले जाऊ लागले आहेत, तेव्हापासून रनरेट वाढतच राहिला आहे. येथे गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट ८.७९ च्या आसपास राहिला आहे. येथे विकेट्स मिळतात तसे धावांचा पाऊसही पडतो. त्यात दोन्ही संघांकडे उत्तम फलंदाज असल्याने हा सामनाही मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे.

दिल्ली आणि लखनऊमध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले गेले. त्यामधील ४ सामने दिल्लीने आणि ३ सामने लखनऊने जिंकले आहेत.मागील हंगामात लखनऊ साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाला होता, तर दिल्लीने चांगली सुरूवात करूनही नंतरचे सामने गमावले आणि स्पर्धेअंती गुणतालिकेत पाचव्या स्थानी राहिले होते. आज दोन्ही संघ कशी सुरूवात करणार याकडे लक्ष असणार आहे. या हंगामात दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल आणि लखनऊचे नेतृत्व रिषभ पंत करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---