---Advertisement---

केएल राहुलचे शतक आणि आवेश खानची शानदार गोलंदाजी; मुंबईला १८ धावांनी नमवत लखनऊ विजयी

On: शनिवार, एप्रिल 16, 2022 7:54 PM
MI-vs-LSG
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा २६वा सामना शनिवारी (दि. १६ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना लखनऊ संघाने १८ धावांनी जिंकला. यासह त्यांनी हंगामातील चौथा विजय खिशात घातला. लखनऊच्या या विजयाचे हिरो केएल राहुल आणि आवेश खान ठरले. केएल राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात मुंबईने (Mumbai Indians) नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत लखनऊला (Lucknow Super Giants) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी लखनऊने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १९९ धावा केल्या होत्या. लखनऊच्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघ ९ विकेट्स गमावत फक्त १८१ धावाच करू शकला.

मुंबईकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त डेवाल्ड ब्रेविसने ३१, तिलक वर्माने २६, कायरन पोलार्डने २५, जयदेव उनाडकटने १४ आणि इशान किशनने १३ धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्मा फक्त ६ धावाच करू शकला. एकाही फलंदाजाला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोठी धावांची खेळी करता आली नाही.

यावेळी लखनऊ संघाकडून गोलंदाजी करताना आवेश खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत ३ विकेट्स खिशात घातले. त्याच्याव्यतिरिक्त जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने सलामीला फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूपर्यंत संघाचा किल्ला लढवला. यावेळी राहुलने ६० चेंडूंचा सामना करताना नाबाद १०३ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने ५ षटकार आणि ९ चौकारही चोपले. त्याच्याव्यतिरिक्त मनीष पांडेने ३८, क्विंटन डी कॉकने २४, दीपक हुड्डाने १५ आणि मार्कस स्टॉयनिसने १० धावांचे योगदान दिले.

यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना जयदेव उनाडकटने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा देत २ विकेट्स चटकावल्या. त्याच्याव्यतिरिक्त मुरुगन अश्विन आणि फॅबियन ऍलेन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या खिशात घातली.

लखनऊ संघ या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, मुंबई संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत १०व्या स्थानी राहिला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मुंबईच्या सामन्यासाठी ‘तेंडूलकर कुटुंबा’ची हजेरी, अंजली आणि सारा तेंडूलकर ठरल्या चाहत्यांचे आकर्षण

मुंबई इंडियन्ससाठी काय पण! टीम संघर्ष करत असताना सूर्यकुमारची लक्षवेधी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला

‘गब्बर’ने लावले कॅप्टन मयंक अन् रबाडासह झक्कास ठुमके; भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूची आली कमेंट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---