Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गब्बर’ने लावले कॅप्टन मयंक अन् रबाडासह झक्कास ठुमके; भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूची आली कमेंट

'गब्बर'ने लावले कॅप्टन मयंक अन् रबाडासह झक्कास ठुमके; भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूची आली कमेंट

April 16, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Mayank-Agarwal-Shikhar-Dhawan-Kagiso-Rabada

Photo Courtesy: Instagram/@shikhardofficial


भारतात सध्या आयपीएल स्पर्धेची धूम आहे. स्पर्धतील जवळपास २५ सामने पार पडले आहे. ही स्पर्धा सुरू असताना अनेक खेळाडू विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्ये आयपीएलच्या १५ व्या हंगामात पंजाब किंग्स संघाकडून खेळणारा सलामीवीर शिखर धवन याचा समावेश आहे. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या संघसहकाऱ्यांसह डान्स करताना दिसत आहे. 

शिखरने (Shikhar Dhawan  काहीदिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्याच्याबरोबर पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) आणि कागिसो रबाडा (Kagiso Rabada) डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी एका व्हायरल गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओला शिखरने कॅप्शन दिले आहे की, ‘माझा हबीबी कागिसो रबाडाकडे खास मुव्ह्ज आहेत.’

शिखर, मयंक आणि रबाडाच्या या अनोख्या डान्सने अनेकांचे लक्ष वेधले आहे. चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात त्यांच्या या डान्सच्या व्हिडिओला पसंती मिळत आहे. भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने देखील प्रतिक्रिया दिली असून त्याने लिहिले की, ‘तूझे मुव्ह्ज पसंत पडत आहेत, कागिसो रबाडा.’

View this post on Instagram

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

पंजाब किंग्सची चांगली कामगिरी
आयपीएलच्या १५ व्या हंगामात मयंक अगरवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत पाच सामने खेळले असून त्यातील तीन सामने जिंकले आहेत. तसेच दोन सामने पराभूत झाले आहेत. पंजाबला कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघांविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या तीन संघांविरुद्ध पंजाब किंग्सने विजय मिळवला आहे. पंजाब सध्या ६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पंजाबकडून शिखरने सर्वाधिक धावा केल्या असून ५ सामन्यांत १९७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच रबाडानेही चांगली कामगिरी केली असून ४ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

तेलही गेलं अन् तूपही! दीपक चाहरला गमवावे लागणार लिलावातील १४ कोटी, रिकामं हात परतावं लागणार घरी

IPL 2022| केकेआर पराभूत होऊनही आंद्रे रसलच्या नावावर अनोखा विक्रम, युसूफ पठाणला टाकलंय मागे

MI vs LSG| रोहितचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; मुंबईकडून ‘या’ खेळाडूचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन


ADVERTISEMENT
Next Post
Suryakumar-Yadav

मुंबई इंडियन्ससाठी काय पण! टीम संघर्ष करत असताना सूर्यकुमारची लक्षवेधी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला

Abhishek-Sharma

Video: पॅट कमिन्सच्या वेगवान चेंडूने अभिषेक शर्माच्या उडवल्या दांड्या, पुल शॉट मारण्याचा केलेला प्रयत्न

KL-Rahul

मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलची नाद खुळा इनिंग, १००व्या सामन्यात झळकावले 'शतक'

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.