इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४२वा सामना शुक्रवारी (२९ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊ संघाने २० धावांनी विजय मिळवला. हा लखनऊचा हंगामातील सहावा विजय होता. या सामन्यानंतर कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या आणि पंजाबला १५४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघाला २० षटकात ८ विकेट्स गमावत १३३ धावाच करता आल्या. हा पंजाबचा हंगामातील पाचवा पराभव होता.
Match 42. Lucknow Super Giants Won by 20 Run(s) https://t.co/fhL4hIBMWr #PBKSvLSG #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2022
पंजाबकडून फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) सर्वाधिक धावा केल्या. त्याने २८ चेंडूत ३२ धावा चोपल्या. यामध्ये ५ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार मयंक अगरवालने (Mayank Agarwal) १७ चेंडूत २५ धावा धावा केल्या. या धावा करताना त्याने २ चौकार आणि २ षटकारही चोपले. याव्यतिरिक्त फक्त ऋषी धवनने नाबाद २१ धावांचे योगदान दिले. बाकी एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी लखनऊकडून गोलंदाजी करताना मोहसीन खानने (Mohsin Khan) सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त दुष्मंता चमीरा आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. याव्यतिरिक्त रवी बिश्नोईनेही १ विकेट आपल्या खिशात घातली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३७ चेंडूंचा सामना करताना ४६ धावा चोपल्या. तसेच, दीपक हुड्डानेही ३६ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. मात्र, दुष्मंता चमीराने १७, मोहसीन खानने १३ आणि जेसन होल्डरने ११ धावांचे योगदान दिले.
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने चमकादर कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच, राहुल चाहरने २ आणि संदीप शर्माने १ विकेट्स खिशात घातल्या.
लखनऊच्या या विजयानंतर त्यांनी गुणतालिकेत भरारी घेतली आहे. त्यांनी गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच, पंजाब संघ सातव्या स्थानी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भीमपराक्रम! अवघ्या २१व्या वर्षी पठ्ठ्याने चोपल्या ५७८ धावा
‘मला नाही माहिती, त्याच्या डोक्यात काय सुरुये’, खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटवर भडकला ‘दादा?’