आयपीएल 2023चा 26 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूरमध्ये संपन्न झाला. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरवत गोलंदाजांनी लखनऊ संघाला 16 धावांवर रोखले. त्याचवेळी या सामन्यात लखनऊसाठी खेळणारा भारताचा अष्टपैलू दीपक हुडा हा पुन्हा एकदा अपयशी ठरला.
या सामन्यात लखनऊ संघाला कर्णधार केएल राहुल व कायले मेयर्स यांनी पुन्हा एकदा चांगली सुरुवात दिली. दोघांनी संघाला 10.4 षटकात 82 धावा करून दिल्या. त्यानंतर तिसऱ्य क्रमांकवर आयुष बडोनी याला बढती मिळाली होती. मात्र, तो केवळ एक धाव करू शकला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीपक हुडा याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या. परंतु, 4 चेंडूत त्याने केवळ 2 धावा काढल्या.
आयपीएल 2023 मध्ये हुडाची बॅट एकदम शांत राहिली आहे. दिल्लीविरुद्ध पहिल्या सामन्यातच त्याने 18 चेंडूवर 17 धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईविरुद्ध दोन, हैदराबादविरुद्ध सात, आरसीबीविरुद्ध 9 तर पंजाबविरुद्ध दोनच धावा तो करू शकलेला. त्याच्या बॅटमधून पाच सामन्यात केवळ 39 धावा आल्या आहेत. त्याची सरासरी अत्यंत लाजिरवाणी अशी 6.50 इतकी खराब दिसून येते.
हुडाने मागील वर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघात जागा मिळवली होती. भारतीय संघातील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर त्याने टी20 विश्वचषक देखील खेळला. यावेळी लखनऊ संघाचा मेंटर गौतम गंभीर याने हुडा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात तरी तो सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.
(Lucknow Supergiants Deepak Hooda Flop In IPL 2023 Out On 2 Against Rajasthan Royals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वीच चहलचा मोठा खुलासा! म्हणाला, आम्ही ‘या’ नियमाचा सर्वाधिक फायदा उचलला
अखेर 14 वर्षांचा वनवास संपला! अर्जुनने घडवून आणली क्रिकेट इतिहासातील अतिदुर्मिळ घटना