आयपीएल 2025च्या आगामी हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल 2025पूर्वी मेगा लिलाव (IPL Mega Auction) आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने (BCCI) नव्या नियमांची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना रिटेंशन यादी जाहीर करावी लागणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, एक संघ जास्तीत जास्त 6 खेळाडूंना कायम ठेवू शकतो. यात 5 कॅप्ड, 1 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश असू शकतो. तत्पूर्वी आपण लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या रिटेंशनबाबत जाणून घेऊया.
लखनऊ सुपर जायंट्सबद्दल (Lucknow Suer Giants) बोलायचे झाले, तर केएल राहुल (KL Rahul) आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran) यांना संघात कायम ठेवले जाऊ शकते. यासोबतच फिरकीपटू रवी बिश्नोईलाही (Ravi Bishnoi) संघात कायम ठेवू शकतो. केएल राहुलबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. पण जिओ सिनेमाच्या रिपोर्ट्सनुसार लखनऊ त्याला पुन्हा संघात कायम ठेवेल. मात्र, तो कर्णधारपदी राहणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
लखनऊचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनने (Nicholas Pooran) अनेक प्रसंगी संघासाठी स्फोटक फलंदाजी केली आणि संघाला सामने जिंकून दिले आहेत. त्यालाही संघात कायम ठेवले जाऊ शकते, तर लखनऊ देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी यांनाही संघात कायम ठेवू शकते.
केएल राहुलच्या (KL Rahul) आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 132 सामने खेळले आहेत, दरम्यान 45.47च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने 4,683 धावा केल्या आहेत, आयपीएलमध्ये राहुलने 37 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वाेच्च धावसंख्या नाबाद 132 राहिली आहे.
निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 76 आयपीएल सामन्यात विस्फोटक फलंदाजी करताना 162.29च्या स्ट्राईक रेटने 1,769 धावा ठोकल्या आहेत. पूरनने आयपीएलमध्ये 9 अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 77 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरूद्धच्या विजयानंतर WTCच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा मोठा फायदा! फायनलसाठी ठरणार पात्र?
भारत दौऱ्यापूर्वी श्रीलंकेनं धुतलं, कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा लाजिरवाणा पराभव
कानपूर कसोटीचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया, सामन्याची ड्रॉ च्या दिशेनं वाटचाल