आयपीएल 2023 चा 51वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात गुजरातने लखनऊविरुद्ध 56 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात पराभूत झाल्याने लखनऊ संघाची प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी काही अंशी कमी झाली आहे. त्यातच आता संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मार्क वूड हा मायदेशी रवाना झाला.
मार्क वूड याला मागील वर्षी लखनऊ संघाने करारबद्ध केले होते. मात्र, गेल्या वर्षी तो दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नव्हता. यावेळी त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार गोलंदाजी करताना पाच बळी मिळवले. मात्र, त्यानंतर काही सामने खेळल्यावर त्याला पुन्हा एकदा दुखापतीचा सामना करावा लागला. असे असताना देखील तो संघासोबत होता. परंतु, तो आता आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी पत्नी सोबत राहण्याकरिता तो इंग्लंडला रवाना झाला आहे. त्याला निरोप देतानाचा व्हिडिओ लखनऊच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. आता तो पुन्हा संघाशी जोडला जाणार नाही.
https://www.instagram.com/reel/Cr89ZhVhh5F/?igshid=MTIyMzRjYmRlZg==
आपल्या संघाला शुभेच्छा देताना तो म्हणाला,
“माझ्या अपत्याच्या जन्मासाठी मी मायदेशी जात आहे. संघाला सोडत असल्याचे नक्कीच वाईट वाटते. आपल्या खेळाडूंनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता शेवटी थोडा जोर लावण्याची गरज असून, आपले खेळाडू ते नक्कीच करतील. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा या शानदार संघासाठी खेळण्यास उत्सुक आहे.”
वूड याने या हंगामात पाच सामने खेळताना 11 बळी मिळवले आहेत. दुसरीकडे लखनऊ संघाने आतापर्यंत 11 सामने खेळताना 5 विजय व एका रद्द झालेल्या सामन्यातील गुणासह 11 गुण मिळवले आहेत. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल.
(Lucknow Supergiants Pacer Mark Wood Leave Sqaud Went To England For His 2nd Child)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लेगस्पिन ग्रॅंडमास्टर’ चहलने केली ब्राव्होची बरोबरी! आयपीएलमध्ये इतिहास रचण्यापासून केवळ एक विकेट दूर
याला म्हणतात इम्पॅक्ट! अवघ्या 7 चेंडूवर फिलिप्सने हिसकावला रॉयल्सच्या तोंडून विजयाचा घास! पठ्ठ्या बनला थेट सामनावीर