कोलकाता नाईट राडयर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील शनिवारचा (20 मे) सामना चांगलाच रोमांचकर झाला. रिकू सिंग याने केकेआरच्या विजयासाठीच्या अपेक्षा शेवटच्या षटकापर्यंत कायम ठेवल्या. मात्र, पूर्ण प्रयत्न करून देखील तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अवघ्या एका धावेने लखनऊ सुपर जायंट्स संघ जिंकला आणि प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली.
कोलकाता या सामन्यात विजयासाठी विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य मिळाले होते. शेवटच्या दोन षटकांमध्ये 41 धावा हव्या होत्या. रिंकू सिंग खेळपट्टीवर असल्यामुळे चाहत्यांच्या विजयाच्या आशा कायम होत्या. 19ल्या षटकात रिंकून तीन चौकार आणि एक षटकार मारत एकूण 20 धावा घेतल्या. शेवटच्या षटकात लखनऊला विजयासाठी 21 धावा हव्या होत्या. स्ट्राईकवर वैभव अरोरा होता. पहिल्या चेंडूवर वैभवने रिंकूला स्ट्राईक दिला. रिंकूला पुढच्या पाच चेंडूंवर 20 धावा हव्या होत्या. त्याने पाच पैकी दोन चेंडूंवर षटकार, तर एका चेंडूवर चौकार मारला, पण अवघी एक धाव कमी पडल्याने केकेआरला सामना गमवावा लागला.
दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्ससाठी निकोलस पुरन पुन्हा एकदा वादळी खेळी करताना दिसला. पुरनने 30 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. वरच्या फळीतील क्विंटन डी कॉक आणि प्रेरक मांकड यांनी अनुक्रमे 28 आणि 26 धावा करून विकेट्स गमावल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अयुष बदोनीने 25 धावांचे योगदान दिले.
कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या लकनऊने 20 षटकांमध्ये 8 बाद 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने 20 षटकांमध्ये 7 बाद 175 धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा विजय महत्वाचा होता, कारण त्यांना प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करायचे होते. दुसरीकडे कोलकाताच्या प्लेऑफच्या आसा सामन्याचा निकाल लागण्याआधीच मावळल्या होत्या. केकेआरने जर हा सामना 8.5 षटकात जिंकला असता, तर त्यांचा संघही प्लेऑफच्या शर्यतीत कायम असता.
या सामन्यानंतर प्लेऑफचे तीन संघ निश्चित झाले. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लकनऊ सुपर जायंट्स हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता फक्त एक संघ निश्चित निश्चित होणे बाकी आहे. क्वॉलिफायर एकमध्ये चेन्नई आणि गुजरात संघ आमने सामने असणार आहेत. तर क्वालिफायर दोनमध्ये लखनऊविरुद्ध कोण खेळणार, हे लवकरच निश्चित होईल. (Lucknow Supergiants qualifies for the 2nd consecutive season!)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्वॉलिफायर एकचे संघ ठरले! केकेआर हंगामातून बाहेर, धोनीच्या सीएसकेशी भिडणार ‘हा’ संघ
धोनीच्या फिटनेसविषयी सीएसके प्रशिक्षकाची मोठी माहिती, कर्णधार धावण्यासाठी करतोय संघर्ष