---Advertisement---

इस्मानिंग चॅलेंजर: भारताचा स्टार टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने गतविजेत्या लुकासचा केला पराभव

On: शुक्रवार, ऑक्टोबर 23, 2020 10:08 AM
---Advertisement---

नवी दिल्ली| भारताचा दुसरा क्रमांकाचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने आणखी एक पराक्रम केला आहे. प्रजनेशने जर्मनीतील इस्मानिंग चॅलेंजर स्पर्धेचा गतविजेता लुकास लॅकोचा 2-1 ने पराभव केला. प्रजनेशने तीन सेटमध्ये 6-4, 5-7 आणि 6-4 ने विजय मिळवला. लुकासने 2019 च्या इस्मानिंग चॅलेंजर स्पर्धेचा किताब जिंकला होता.

प्रज्ञेशने तिसऱ्या सेटमध्ये मिळवला विजय
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय टेनिसपटूसाठी हा दिवस सोपा नव्हता. पहिल्या सेटमध्ये त्याने जर्मनीच्या लुकासविरुद्ध 6-4 ने विजय मिळवला. परंतु त्यानंतर त्याने दुसरा सेट गमावला. दुसर्‍या सेटमध्ये लुकासने पुनरागमन केले व प्रज्ञेशला 5-7 ने मात दिली आणि सामन्यात एक-एकने बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र प्रज्ञेशने जोरदार पुनरागमन करत हा सेट 6-4 ने जिंकला आणि सामनाही खिशात घातला.

या विजयाबरोबरच प्रज्ञेशने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना डॅनिएल मासूर विरुद्ध होईल.

दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्यांदा झाला सामना

प्रज्ञेशचा लोको विरुद्ध दुसरा सामना होता. प्रज्ञेशला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. अटलांटा (अमेरिका) येथे हा सामना खेळला गेला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

दुखापतीतून सावरल्यानंतर रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत होणार सहभागी

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पॅरिस मास्टर स्पर्धेत राफेल नदाल होणार सहभागी

जर्मनीच्या झ्वेरेव्हने जिंकले कोलोन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---