जर्मन संघाकडून आपला शेवटचा सामना खेळात असलेल्या लुकास पोडोलस्कीसाठी ह्या सामन्याची जागा विशेष आहे. इंग्लंड विरुद्ध मैत्रीपूर्ण असलेला सामना ह्यावर सर्वांची नजर असण्याचा कारण देखील पोडोलस्की होता. आजवर जर्मन संघासाठी कायमच उत्तम कामगिरी करण्याऱ्या खेळाडूचा हा शेवटचा सामना ज्यात तो जर्मन संघाचा गणवेश धारण करणार होता.
कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात प्रथमच कर्णधार म्हणून देखील पोडोलस्कीने अचूक कामगिरी बजावली. अफलातून गोल करत त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला व १-० असा सामना संपला. सामना संपायला २० मिनिटे राहिली असताना त्याने गोलच्या उजव्या कोपऱ्यात अप्रतिम बॉल मारला जो हार्ट ला रोखता आला नाही. डाव्या पायाच्या खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोडोल्स्कीने आपला अंतिम गोल देखील याच प्रकारे करून चाहत्यांची मने जिंकली.
जर्मनीकडून आजवर खेळत त्याने १३० सामन्यांमध्ये ४९ गोल नोंदवले आहेत. जर्मनीकडून खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू आहे. जर्मन संघाकडून त्याने ३ विश्वचषकात सहभाग घेतला आहे व ४ युरो कप मध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे.