जीएसटी कस्टम्स, पुणे, हॉकी लव्हर्स क्लब आणि सेंट्रल रेल्वे क्लब पुणे क्रीडा प्रबोधिनीमध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या एम. जे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी निश्चित केली. उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघाने आतापर्यंत अपराजित राखले आहे.
धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. जीएसटी कस्टम्स, पुणे संघाने हॉकी लव्हर्स अॅकॅडमीचा (HLS) 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अनिकेत गुरव (20वे) आणि अब्दुल सलामानी (55वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला तर स्टीफन स्वामी (5वे, 42वे) आणि बी. फेलिक्स (23वे, 59वे) यांनी दुहेरी गोल केले. हॉकी लव्हर्स अॅकॅडमीसाठी (एचएलए) फजर शेख (19 वे) आणि सरयाज आलम (37 वे) यांनी गोल करीत चांगली लढत दिली. तथापि, शेवटी जीएसटी कस्टम्सने विजय मिळविला.
साखळी ब गटात उपांत्यपूर्व फेरीत हॉकी लव्हर्स क्लबने सलग दुसरा विजय मिळविताना मुंबई रिपब्लिकन्सचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. निखिल भोसले (18वे, 41वे) आणि यश अंगीर (23वे) याने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलात करीत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. श्रीकिशन चौरसिया (४२व्या) याने पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करून मुंबई संघाकडून चिवट लढत दिली.
रविवारी झालेल्या सामन्यात मध्य रेल्वेच्या पुण्याने मुंबई रिपब्लिकन्सचा 3-1 असा धुव्वा उडविला होता. महिला विभागात, पीसीएमसी हॉकी अकादमी आणि मुंबई रिपब्लिकन या दोघांनी साखळी गटात जेजे अकादमीवर विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीसीएमसी हॉकी अकादमीने सोमवारी दुपारी झालेल्या सामन्यात मुंबई रिपब्लिकन संघावर 4-0 असा विजय मिळवला. शालीनी साकुरे (12वे) दुर्गा शिंदे (29वे) आणि सानिका माने (39वे, 53वे) यांनी केलेले दोन गोल विजयासाठी आणि साखळी गटामध्ये अव्वल होण्यासाठी पुरेसे होते.
साखळी अ गटातील लढतीत यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमी आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी प्रत्येकी एक गुण घेताना पूर्ण लढतील 0-0 अशी बरोबरी स्वीकारली. (M J Cup 3rd Invitational Hockey Tournament GST Customs and Hockey Lovers advance to Quarter Finals)
हेही वाचा
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही बनले विराटचे चाहते; म्हणाले, ‘बंगळुरूमध्ये जेव्हा मी त्याला…’
हार्दिक पंड्याची पत्नी नताशा चाहत्यांच्या निशाण्यावर, पोस्टवर अश्लिल कमेंट करत केले ट्रोल






