पुणे: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत मदन आणि रामजी कश्यप यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर चेन्नई क्विक गन्स संघाने राजस्थान वॉरियर्स संघाचा 21 गुणांच्या फरकाने धुव्वा उडवताना पुन्हा एकदा विजयी पुनरागमन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सलग दोन पराभव पत्करल्यानंतर या सामन्यात उतरताना चेन्नई क्विक गन्स संघाने आक्रमक पवित्रा स्वीकारला. प्रथम संरक्षण करताना मदन याने 3मिनिटे 55 सेकंद असे बहुमोल संरक्षण करून चेन्नईला मजबूत प्रारंभ करून दिला. कश्यपने दुसऱ्या डावातील 2मिनिटे 9 सेकंदासह एकूण 5मिनिटे 2सेकंद संरक्षण करतानाच काही बहुमोल गुणांची नोंद करून अष्टपैलू कामगिरी बजावली. महेश शिंदेने ही 3मिनिटे 3सेकंद सरंक्षण करताना चेन्नईच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.
राजस्थान कडून अक्षय गनपुळे 7 गडी बाद करताना सर्वोत्तम कामगिरी केली. त्याआधी तिसऱ्या सत्रात तब्बल 20गडी बाद करून चेन्नई संघाने राजस्थानच्या हातून सामना काढूनच घेतला. तिसऱ्या संत्रा अखेर चेन्नईकडे 53-19 अशी दणदणीत आघाडी होती. याच आघाडीच्या जोरावर चेन्नईने अखेर 57-36 अशा फरकाने विजय मिळवला.
तत्पूर्वी प्रथम आक्रमण करताना पी नरसय्यायाने चेन्नईला पहिला ब्रेक मिळवून देताना अभिजीत पाटीलला तंबूत परतवले. त्यामुळे त्यांना पहिल्या सत्राअखेर 23गुणांची आघाडी घेता आली. परतीच्या सत्रात शिंदे, कश्यप आणि मदन यांच्या अभेद्य बचावामुळे चेन्नईला आपली पकड कायम राखता आली. शिंदेने 3मिनिटे3सेकंद संरक्षण करताना चेन्नईला 4 बोनस गुण मिळवून दिले. त्यानंतर कश्यपने 2मिनिटे 53 सेकंद तर, मदनने 3मिनिटे 45 सेकंद संरक्षण केल्यामुळे चेन्नईला 6बोनस गुणांसह पहिल्या डावा अखेर 33-15 अशी आघाडी घेता आली होती.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
रात्री सलग चार सामन्यात विजय मिळवणाऱ्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या ओडिशा जगरनाट्स संघाचा सामना मुंबई खिलाडीज यांच्याशी होणार आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
खास सामन्याआधी विराटला आल्या आफ्रिकेतून शुभेच्छा! जिगरी यार एबी म्हणतोय…
आठ वर्षांपासून सुरू असलेल्या वर्चस्वाची मालिका टीम इंडिया सुरूच ठेवणार? वाचा ही आकडेवारी
ASIA CUP: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मास्टर ब्लास्टर उत्सुक; शेअर केलाय खास फोटो