---Advertisement---

आरसीबीचा पाटीदार रणजीतही चमकला, पंजाबला १० विकेट्सने झुकवत मध्यप्रदेश सेमीफायनलमध्ये दाखल

On: गुरूवार, जून 9, 2022 1:26 PM
Madhya-Pradesh
---Advertisement---

भारतात सध्या रणजी चषकाच्या बाद फेरीतील सामने सुरू आहेत. या बाद फेरीतील चौथ्या उपांत्यपूर्व सामन्याची लढत मध्य प्रदेश आणि पंजाब या दोन संघांमध्ये झाली. या सामन्यांत मध्य प्रदेशच्या संघाने पंजाबचा १० गडी राखत पराभव केला आणि उपांत्य सामन्यांत धडक मारली. 

यासामन्यांत नाणेफएक जिंकत पंजाबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्या डावांत पंजाबने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे काही काळ वाटले होते. पंजावने पहिल्या डावात फलंदाजी करत २१९ धावा केल्या. सलामीवीर कर्णधार अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रित सिंग या दोघांनीही प्रत्येकी ४७ धावांची खेळी केली. मात्र, शुभमन गीलला या सामन्यांत विशेष खेळी करता आली नाही. मध्य प्रदेशचे गोलंदाज पुनित दाते आणि अनुभव आग्रवाल यांनी प्रत्येकी ३ बळी घेत पंजाबला जास्त धावा करण्यापासून रोखले.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मध्य प्रदेशने मात्र, आपल्या पहिल्या डावांत धावांचा डोंगर उभारला. शुभम शर्माचे शतक आणि हिमांशू मंत्री, रजत पाटीदार आणि अक्षत रघुवंशी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरवर मध्य प्रदेशने १० बाद ३९७ धावा केल्या. यावेळी पंबाजकडून फिरकीपटू विनय चौधरीने सर्वाधिक ५ बळी घेतले. पहिल्या डावाच्या अखेरीस मध्य प्रदेशने १७८ धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावांत फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबसंघाला केवळ २०३ धावा करता आल्या. यावेळी पंजाबसाठी अनमोल मल्होत्राने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. मात्र, मध्य प्रदेशचे फिरकीपटू कुमार कार्तिकेय सारांश जैन यांनी गेलंदाजीत विशेष चमक दाखवली. कार्तिकेयने ६ आणि सारांशने ४ बळी घेत पंजाबच्या संघाचा डाव संपुष्टात आणला. दुसऱ्या डावाच्या अखेरीस पंजाबला केवळ २५ धावांची आघाडी घेता आली.

दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेश संघाचा विडय केवळ एक औपचारिकता होती. २६ धावांचा पाठलाग करणाऱ्या मध्य प्रदेशच्या संघाला लक्षय साध्य करण्यासाठी केवळ ५.१ षटकांची गरज भासली. आणि या बाद फेरीत मध्य प्रदेशने पंजाबचा धुव्वा उडवत उपांत्या सामन्यांत धडक मारली.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

करण शर्माची ‘कर्णधार’ खेळी, उत्तर प्रदेशची कर्नाटकवर ५ विकेट्सने मात; सेमी फायनलमध्येही प्रवेश

हॅरिस राउफचा विकेट्सचा चौकार, बाबर आझमचे शतक; पहिल्या वनडेत पाकिस्तानचा ५ विकेट्सने विजय

‘संजूला संघात आणा’, केएल राहुल बाहेर झाल्याने चाहत्यांकडून मागणीला जोर, ट्विट्सचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---