भारताचा 18 वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने फिडे बुद्धिबळ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारला. गुरुवारी (24 ऑगस्ट) या अंतिम सामन्यात जगातील क्रमांक एक रँकिंग असणारा बुद्धिवळपटू मॅग्नस कार्लसन याने बाजी मारली. अंतिम सामन्यात दोन दिवसांमध्ये दोन डाव खेळले गेले आणि दोन्ही डाव बरोबरीत सुटले. त्यानंतर टायब्रेकमघ्ये सामना निकाली निघाला.
तीन दिवस चाललेल्या या अंतिम सामन्यात एकून चार डाव झाल्यानंतर सामना निकाली निघाला. 18 वर्षीय आर प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) याने पहिल्या दोन डावांमध्ये 32 वर्षीय कार्लसनला कडवे आव्हान दिले. दोघांमध्ये मंगळवारी पहिल्या फेरी पार पडली, ज्यामध्ये 34 चाल चालल्या गेल्या. मात्र, निकाल एका बाजूने लागला नाही. दुसरी फेरी बुधवारी खेळली गेली. दोघांमध्ये एकून 30 चाल चालल्या गेल्या आणि यावेळीही दोन्ही खेळाडू बरोबरीवर होते. पहिल्या दोन दिवसांमध्ये दोघांनी सरस प्रदर्शन करत सामना बरोबरीत ठेवला. पण गुरुवारी (24 ऑगस्ट) टायब्रेकरमध्ये सामना मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) याच्या बाजूने निकाली निघाला.
टायब्रेकरमध्ये दोन गेम झाले. यात चालल्या गेलेल्या 47 चालींनंतर प्रज्ञानंद मागे पडला. दुसऱ्या गेममध्ये त्याला आगाडीची अपेक्षा होती. मात्र, याही वेळी त्याला कार्लसनवर मात करता आली नाही. वर्ल्डकप विजयानंतर त्याला बक्षीस म्हणून एक लाख 10 हजार अमेरिकन डॉलर्स मिळतील. कार्लसन आपल्या बुद्धिबळ कारकिर्दीत सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. (Magnus Carlsen won the title of world champion for the 6th time Hard luck Praggnanandhaa )
महत्वाच्या बातम्या –
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेव्हन्स, ईगल्स संघांचा दुसरा विजय
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत आठव्या फेरी अखेर सेतुरामन एसपीची आघाडी कायम