---Advertisement---

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती

---Advertisement---

सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी ‘किताब पटकावून दुसराच ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनलेल्या विजय चौधरीची महाराष्ट्र शासनाने पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली. गेले कित्येक दिवस सुरु असलेला नियुक्तीचा घोळ आज फडणवीस सरकारने विजयच्या नियुक्तीने संपुष्टात आणला.

गेल्या दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये शासनाने दिलेला शब्द आज अखेर पूर्ण केला. डिसेंबर २०१६ मध्ये विजयला लवकरच नोकरीत घेऊ असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले होते. हिवाळी अधिवेशनात डिसेंबर २०१६ मध्ये विधानसभेत विजय चौधरींचं अभिनंदन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली होती. परंतु नोकरी देण्याबाबत होत असलेला उशीर पाहून विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही हा विषय लावून धरला होता.

नियुक्तीला होत असलेल्या टाळाटाळबद्दल सोशल मीडियावर विजयच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला जात होता. त्यात ट्विटरवरील मराठी मंडळी अग्रेसर होती.

थोडसं  विजयबद्दल:
विजय हा जळगाव जिल्ह्यातील सायगावचा असून त्याचे सध्या वय २९ वर्ष आहे. विजयने २०१४, २०१५ आणि २०१६ साली मानाचा महाराष्ट्र केसरी ‘किताब पटकावला आहे. विजय पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात सराव करतो. विजय जून ते नोव्हेंबर महिन्यात पंजाबमधील धूमछडी आखाडा येथे हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो तर पुण्यात ज्ञानेश्वर मांगडे आणि महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो  सराव करतो.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment