२०१७ ची आयपीएल जरी मुंबईने जिंकली असले तरी मुंबईच्या एकही फलंदाजने या मोसमात शतक ठोकले नाही किंवा एकाही गोलंदाजाने हॅट्रिक घेतलेली नाही. मुंबई इंडियन्सने अंकतालिकेत सर्वाधिक सामने जिंकून पहिले स्थान मिळवले होते. या संघाने दाखवून दिले की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि फक्त वयक्तिक कामगिरीवर कोणता ही संघ जिंकू शकत नाही.
२०१७ च्या मोसमात या वर्षी काही चांगल्या वयक्तिक कामगिरी आयपीएलमध्ये पहायला मिळाल्या. यावरूनच महा स्पोर्ट्सने आपला एक आयपीएल संघ निवडला आहे.
पाहुयात कोणाला मिळाली या संघात संधी:
१. हाशिम आमला : १० सामन्यात २ शतकांसह ४२० धावा आणि १४० चे स्ट्राईक रेट, हाशिम आमलाने २०१७च्या आयपीएलयामध्ये अशी चमकदार कामगिरी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. आमला हा टी २०चा खेळाडू नाही असे म्हणणार्यांना त्याने त्याच्या बॅटने चांगलेच उत्तर दिले आहे.
२. डेविड वॉर्नर : १० व्या मोसमाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर हा या वर्षीच्याच नाही तर कोणत्याही वर्षीच्या आयपीएलच्या संघात सहज प्रवेश करेल अशी त्याची फलंदाजी मागील काही वर्षात राहिली आहे. त्याने या वर्षी १४ सामन्यात ६४१ धावा केल्या आहेत ज्यात त्याची सरासरी ६० ची आहे.
३. गौतम गंभीर : १६ सामन्यात ४९८ धावा करत कोलकाता नाईट राईडरच्या कर्णधाराने एकहाती संघाच्या फलंदाजीचा भार उचलून संघाला प्ले ऑफ पर्यंत नेले. गंभीरने या वर्षी १३०च्या स्ट्राईक रेटने ४ अर्ध शतकेही ठोकली आहे.
४. सुरेश रैना : मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणाऱ्या सुरेश रैनाने या वर्षी त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे. त्याने या वर्षी खेळलेल्या १४ सामन्यांनमध्ये ४२१ धावा केल्या आहेत. त्याने ४०च्या सरासरीने या धाव केल्या आहे. त्यात ३ अर्धशतकेही सामील आहेत.
५. बेन स्टोक्स : रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि या वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्सने त्याला दिलेल्या एक एका पैशाचा हिशोब आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीतून दिला आहे. स्टोक्सने खेळलेल्या १२ सामन्यात त्याने ३१६ धाव केल्या आहे त्यात एक सामना जिंकवणारे शतक आणि अर्धशतकाचा समावेश आहे.
६. दिनेश कार्तिक : गुजरातकडून खेळताना कार्तिकने या वर्षी आपली प्रतिभा दाखवून दिली आणि यामुळेच त्याची निवड चॅम्पियनस ट्रॉफीच्या संघात झाली आहे असे दिसून येते. या मोसमात कार्तिकने १४ सामन्यात ३६१ धाव केल्या आहेत आणि त्याने क्षेत्ररक्षण देखील उत्तम केले.
७. कृणाल पंड्या : अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला कृणाल पंड्या, या मुंबईच्या अष्टपैलू खेळाडूने सर्वांनाच आपल्या ऑलराऊंड कामगिरीने प्रभावित केले आहे. त्याने या मोसमात १३ सामन्यात २४३ धावा आणि १० बळी घेतले आहेत.
८. मिचेल मॅक्क्लेनहागन : मुंबईचा हा वेगवान गोलंदाज, या मोसमातील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. तो जरी मुंबईचे शेवटचे काही सामने खेळला नसला तरी मुंबईला अंकतालिकेत सर्वात वर घेऊन जाण्यात त्याचा सिहांचा वाट होता.
९. भुवनेश्वर कुमार : पर्पल कॅपचा मानकरी आणि हैद्राबादचा एक्सप्रेस गोलंदाज भुवनेश्वर कुमारने लागोपाठ २ वर्ष सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. या आधी असे कोणत्याही गोलंदाजाला जमले नाही. त्याने या वर्षी १४ सामन्यात २६ बळी घेतले आहेत.
१०. जसप्रीत बुमरा : यॉर्कर किंग म्हणून उदयास आलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीतने या मोसमातही काही कमालीची गोलंदाजी करून दाखवली आहे. त्याने या वर्षी १६ सामन्यात २० बळी घेतले आहेत आणि त्याची इकॉनॉमिही ७. ५० च्या दरम्यानची आहे.
११. यजुर्वेंद्र चहल : या वर्षी जरी रॉयल चालेंजर्स बंगलोरला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नसली तरी या युवा गोलंदाजाने नक्कीच खूप प्रभावित केले आहे. आरसीबीकडून खेळताना त्याने १३ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत.