---Advertisement---

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केली कोरोना टेस्ट; असा आला रिपोर्ट

On: शनिवार, जुलै 25, 2020 6:40 PM
---Advertisement---

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सौरव गांगुलीची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. सौरवमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, तरीही त्याने आपली कोरोना टेस्ट करुन घेतली होती.

स्नेहाशीषला कोरोनाची लागण झाल्यानंतर सौरव होम क्वारंटाइनमध्ये होता. स्नेहाशीषवर सध्या महानगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे सौरव गांगुली अजूनही बीसीसीआयची सर्व कामे घरातून करीत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीसीसीआयच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेत आहे. सौरव गांगुली होम क्वारंटाइनमध्ये असल्याने त्याचा प्रसिद्ध बंगाली रिऍलिटी शो ‘दादागिरी अनलिमिटेड’ चे शूटिंगही पुढे ढकलण्यात आले आहे.

कोविड-19 या साथीच्या आजारामुळे केवळ बोर्डाचे अधिकारीच नाही तर भारतीय संघाचे खेळाडूही आजकाल त्यांच्या घरी आहेत. याक्षणी भारतातील परिस्थिती पाहता येथे क्रिकेट सुरू होण्याची शक्‍यता नाही. प्रत्येकजण परिस्थिती सामान्य होण्याच्या प्रतीक्षेत आहे. भारतीय क्रिकेटपटू आजकाल घरी फिटनेस वर्कआउट करत आहेत. तथापि काही खेळाडूंनी मैदानी सराव देखील सुरू केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षण शिबिर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. जेथे सर्व खेळाडू पुन्हा तंदुरुस्तीवर काम करतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येण्यासाठी स्वतःला तयार करतील. भारतीय खेळाडू आता 19 सप्टेंबरपासून दुबई येथे सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळताना दिसून येतील. पण आयपीएलपूर्वी भारत-दक्षिण आफ्रिका संघातील तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाईल. या दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---