क्रिकेट सामन्यात सुपर ओव्हर पाहण्याचा थरार काही वेगळाच असतो. शेवटच्या क्षणी विजयाची अपेक्षा असताना सामना बरोबरीत सुटतो आणि सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. मात्र कधी कधी सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यास पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवून सामन्याचा निकाल लावला जातो.
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या अनेक स्पर्धा खेळल्या जात आहेत. काही राज्यांमध्ये टी20 लीग देखील आयोजित केल्या जात आहेत, ज्यात महाराजा टी20 ट्रॉफीचा समावेश आहे. या लीगमध्ये एक चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात 1 किंवा 2 नव्हे तर एकूण 3 सुपर ओव्हर खेळल्या गेल्या, ज्यानंतर सामन्याचा निकाल लागला. हा सामना बेंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात खेळला गेला. हुबळी टायगर्सची कमान मनीष पांडे याच्या हाती आहे. त्याचवेळी बेंगळुरू ब्लास्टर्स संघ मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
एकाच सामन्यात 3 सुपर ओव्हर
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी केली. हुबळी टायगर्स संघ 20 षटकात 164 धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बेंगळुरू ब्लास्टर्सला 20 षटकांत 164 धावाच करता आल्या. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली, जेणेकरून सामन्याचा निकाल लावता येईल. सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 1 गडी गमावून 10 धावा केल्या. अशा स्थितीत हुबळी टायगर्सला विजयासाठी 11 धावा करायच्या होत्या, पण हुबळी टायगर्स संघाला 10 धावाच करता आल्या.
पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी करत दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 8 धावा केल्या. मात्र 9 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना बेंगळुरू ब्लास्टर्स संघ 1 विकेट गमावून केवळ 8 धावा करू शकला. अशा स्थितीत हा सामना तिसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. तर तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 1 विकेट गमावून 12 धावा केल्या. यावेळी हुबळी टायगर्स संघाने 13 धावा केल्या आणि सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरू ब्लास्टर्सचा पराभव करून सामना जिंकला.
हेही वाचा –
इशान किशनने वाढवली प्रशिक्षक गंभीरची डोकेदुखी! फलंदाजीनंतर गोलंदाजीत करतोय कमाल
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी डेंग्यूतून सावरला वेगवान गोलंदाज, दुलीप ट्रॉफीत खेळणार
ऑस्ट्रेलियाकडून खेळणार भारतीय वंशाच्या 3 क्रिकेटपटू, ‘या’ क्रिकेट मालिकेत घडणार नवीन पराक्रम