Umran Malik : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचे दोन आघाडीचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांना या मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या मालिकेत युवा वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. यामध्ये जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचे देखील नाव असण्याची शक्यता आहे. नुकताच तो डेंग्यूच्या आजारातून सावरला असून, आगामी दुलिप ट्रॉफीची तयारी करत आहे.
बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे, शमी वनडे वर्ल्डकपपासून संघाबाहेर बाहेर आहे. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. शमी नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे प्रशिक्षण घेत असून त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून बाहेर ठेवले जाऊ शकते.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी दुलिप ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये 4 संघ सहभागी होणार आहेत. दुलिप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याकडे अनेक खेळाडूंचे लक्ष लागले आहे. काही खेळाडूंना कसोटी संघात आपले स्थान निर्माण करायचे असते. त्यापैकी एक म्हणजे उमरान मलिक. भारतातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज असलेला उमरान हा बऱ्याच दिवसांपासून दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीय संघात जागा मिळाली नाही.
डेंग्यूमधून बरा झाल्यानंतर उमरान मलिक दुलिप ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करत आहे. दुलिप ट्रॉफी 5 सप्टेंबर 2024 पासून अनंतपूर (आंध्र प्रदेश) आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम (बेंगळुरू) येथे सुरू होणार आहे. उमरान मलिकला सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रजत पाटीदार आणि इतरांसह टीम सी मध्ये स्थान देण्यात आले आहे. अलीकडेच 24 वर्षीय उमरानने देशांतर्गत स्पर्धेच्या तयारीबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. या स्पर्धेत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची आशा त्याने व्यक्त केलेली.
हेही वाचा –
3 असे फलंदाज, जे दुहेरी शतकाच्या जवळ असताना कर्णधारानं डाव घोषित केला; दोन भारतीयांचाही समावेश
इंग्लंड क्रिकेटला मिळाला नवा स्टार खेळाडू! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून मोडला 94 वर्ष जुना विक्रम
ऑस्ट्रेलियाकडून खेळणार भारतीय वंशाच्या 3 क्रिकेटपटू, ‘या’ क्रिकेट मालिकेत घडणार नवीन पराक्रम