देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-2023 चा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. स्पर्धेच्या अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यांनंतर उपांत्यपूर्व फेरीचे संघ अंतिम झाले. एलिट बी गटातील मुंबई विरुद्ध महाराष्ट्र हा सामना अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघांना याचे नुकसान झाले. याच गटातील आंध्र प्रदेश संघाने आसामविरुद्ध मोठा विजय मिळवल्याने त्यांना उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळाले.
Mumbai vs Maharashtra – Match Drawn #MUMvMAH #RanjiTrophy Scorecard:https://t.co/QsAe9FNdcu
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2023
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना विजय अथवा निर्णायक आघाडीने सामना अनिर्णित ठेवणे अनिवार्य होते. महाराष्ट्राने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केदार जाधव याच्या शतकाच्या मदतीने 384 धावा काढल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबई संघाने तनुष कोटियान याच्या 91 धावांच्या मदतीने तितकीच धावसंख्या उभारली. दोन्ही संघांची पहिल्या डावातील धावसंख्या समान झाल्याने या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवणे अनिवार्य होते. मात्र, अखेरच्या दिवसापर्यंत पोहोचलेल्या या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. मुंबईला अखेरच्या दिवशी मिळालेले निर्धारित धावांचे आव्हान पार करण्यात अपयश आले. तसेच, महाराष्ट्राला देखील मुंबईला ऑल-आउट करण्यात यश आले नाही. या अनिर्णित राहिलेल्या सामन्यामुळे मुंबई व महाराष्ट्राची उपांत्य फेरीत जाण्याची संधी हुकली
त्याचवेळी या गटातील इतर सामन्यांमध्ये सौराष्ट्राने तमिळनाडूचा व आंध्र प्रदेशने आसामचा डावाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. साखळी फेरीच्या या अखेरच्या सामन्यांनंतर आता उपांत्यपूर्व फेरीची रूपरेषा समोर आली आहे. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत बंगाल विरुद्ध झारखंड, दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंड विरुद्ध कर्नाटक, तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश व चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्र विरुद्ध पंजाब असा सामना होईल.
(Maharashtra And Mumbai Out Of Ranji Trophy 2022 2023 Quarter Finals Line Up Announced)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रांची टी20 मध्ये हार्दिक ‘टॉस का बॉस’! प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पृथ्वी बाकावरच
मोठी बातमी! भारतीय महिलांचा विश्वचषकात दबदबा, न्यूझीलंडला नमवत मिळवले फायनलचे तिकीट