---Advertisement---

६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १५ खेळाडूंची निवड

On: शनिवार, जानेवारी 19, 2019 6:21 PM
---Advertisement---

भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने 66 वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत रोहा, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे.

या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सराव शिबिरातून 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हे सराव शिबिर रायगड जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. १३ जानेवारी पासून अलिबाग रायगड याठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

15 जणांच्या या संघात सिद्धार्थ देसाई, रिशांक देवाडीगा, गिरीष एर्नाक या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्यूनियर संघातील पंकज मोहिते याचीही या संघात निवड झाली आहे.

या 15 जणांच्या संघातून 12 जणांचा अंतिम संघ 24 जानेवारीला निश्चित होणार आहे. तोपर्यंत हे 15 खेळाडू रोहा शिबिरात सराव करतील.

या स्पर्धेत मागील वर्षी महाराष्ट्र संघाने 11 वर्षांनंतर विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे हे विजेतेपद कायम राखण्याचे यावर्षी महाराष्ट्र संघासमोर आव्हान असणार आहे.

असा आहे 15 जणांचा महाराष्ट्र संघ –

1. विकास काळे – पुणे

2. गिरिष एर्नाक – ठाणे

3. विशाल माने – मुंबई सिटी

4. रिशांक देवाडीगा – मुंबई उपनगर

5. निलेश सालुंखे – ठाणे

6. अमिर धूमाळ – रायगड

7. सुनील दुबील – पुणे

8. सिद्धार्थ देसाई – पुणे

9. संकेत बनकर – रायगड

10. अजिंक्य पवार – रत्नागिरी

11. तुषार पाटिल – कोल्हापूर

12. अभिषेक भोजने – रत्नागिरी

13. अशिष मोहिते – मुंबई उपनगर

14. पंकज मोहिते – मुंबई सिटी

15. सचिन शिंगाडे –  सांगली

महत्त्वाच्या बातम्या – 

रण झुंजार संघ अयोजीत भव्य किशोर गट (मुले) कबड्डी स्पर्धा आजपासून

असा कबड्डीचा सामना तुम्ही १००% पाहिला नसेल…खेलो इंडियात रंगला कबड्डीच्या अंतिम फेरीचा थरार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment