बिहार राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा- बिहार येथे सुरू असलेल्या ३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय स्पर्धेला आज उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने पार पडले.
मुलाच्या विभागात महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा यादोन बलाढ्य संघात अंतिम फेरीचा सामना रंगला. दोन्ही संघ तुल्यबल असल्याने सामना पण तसाच झाला. हरियाणा संघाने आक्रमक खेळ करत आघाडी मिळवली होती. मध्यंतराआधी महाराष्ट्र संघावर लोन टाकत हरियाणाने १८-१५ अशी आघाडी मिळवली होती.
मध्यंतरानंतर महाराष्ट्र संघाने जोरदार खेळ करत सामन्यात हरियाणाला जास्त आघाडी मिळवून दिली नाही. त्यानंतर महाराष्ट्र संघाने हरियानावर लोन टाकला. शेवटच्या चढाईत आधी ३६-३६ असा सामना बरोबरीत होता. महाराष्ट्राच्या पियुष पाटीलने चढाईत १ गुण मिळवत महाराष्ट्राला ३७-३६ असा विजय मिळवून दिला. पियुष पाटील बरोबरच दीपक, आझाद, अमरसिंग, प्रवण, शब्बीर यांनी महाराष्ट्राचा विजयात मोलाची भूमिका बजावली.
तर मुलींच्या विभागात साईच्या संघाने ५९-२२ असा सहज दिल्लीचा धुव्वा उडवला. त्याआधी झालेल्या सामन्यात दिल्लीने तामिळनाडू वर २४-२२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, तर साईने बिहारवर ६०-२६ असा विजय मिळवला होता.
किशोर गट मुले निकाल
उपांत्य फेरी:
१) महाराष्ट्र ४३ वि कर्नाटक १६
२)हरियाणा ३४ वि बिहार २१
अंतिम सामना:
महाराष्ट्र ३७ वि हरियाणा ३६
किशोरी गट मुली निकाल
उपांत्य फेरी:
१) साई ६० वि बिहार २६,
२)दिल्ली २४ वि तामिळनाडू २२
अंतिम सामना:
साई ५९ वि दिल्ली २२