भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या निर्णायक सामन्यात यजमान भारताने न्यूझीलंडला डोकेही वर न काढू देता 168 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. या सामन्याला क्रीडा व राजकीय क्षेत्रातील अनेक मातब्बर व्यक्तींनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी देखील या सामन्याचा आस्वाद घेतला.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या मैदानावर तब्बल 1 लाख 30 हजार प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. उभय संघातील या अखेरच्या टी20 सामन्याआधी नुकत्याच झालेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा सन्मान केला गेला. या सन्मानासाठी सर्वच राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी देखील या सामन्यासाठी हजेरी लावली.
काय ती भारत-न्यूझीलंड मॅच…
काय ती शुबमन गिलची धुवाँधार बॅटिंग…
काय ती हार्दिक पंड्याची बॉलिंग…
काय तो प्रेक्षकांचा उत्साह
आणि काय तो टीम इंडियाने मिळवलेला शानदार विजय…एकदम झक्कास…! pic.twitter.com/y4O5Ue3Cjs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 2, 2023
या सामन्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत लिहिले,
‘काय ती भारत-न्यूझीलंड मॅच… काय ती शुबमन गिलची धुवाँधार बॅटिंग… काय ती हार्दिक पंड्याची बॉलिंग… काय तो प्रेक्षकांचा उत्साह आणि काय तो टीम इंडियाने मिळवलेला शानदार विजय… एकदम झक्कास…!’
रोहित पवार यांची मागील महिन्यातच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
आमदाबाद येथील सामन्याचा विचार केल्यास, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या नाबाद 126 व राहुल त्रिपाठीच्या 44 धावांच्या जोरावर भारताने 4 बाद 234 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. हार्दिक पंड्याच्या चार व इतर गोलंदाजांच्या प्रत्येकी दोन बळींच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव 66 धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाचा हा टी20 इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.
(Maharashtra Cricket Association President Rohit Pawar Attend India V Newzealand T20I In Ahmedabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने
‘या यशाचे श्रेय वडिलांचे’, अहमदाबादमधील शतकानंतर शुबमनची कृतज्ञ कबुली