पुणे | भारत विरुद्ध विंडीज तिसरा वन-डे सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशियन स्टेडियम, गहुंजेवर होत आहे. भारत या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे.
या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या सामन्याला महत्त्व आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत दोन स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यात स्वारगेटजवळ असलेल्या नेहरु स्टेडियमचा समावेश आहे.
याच नेहरु स्टेडियमवर भारतीय संघ १९८४ ते २००५ या काळात एकूण ८ सामने खेळला असुन त्यात ५ विजय मिळवले आहेत तर ३ सामन्यात संघाला पराभव पहावा लागला. २००५ नंतर या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. तसेच या स्टेडियमला कोणतीही कसोटी किंवा आंतरराष्ट्रीय टी२० सामना आयोजीत करण्याचे भाग्य लाभले नाही.
तब्बल ७ वर्षांनी २०१२ पासून पुणेकरांना हक्काचे नविन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मिळाले. आयपीएलमध्ये पुण्याचे दोन संघ आजपर्यंत खेळले आहेत. त्या दोन्ही संघाचे हे मैदान होम ग्राऊंड राहिले आहे.
टी२०मध्ये फिफ्टी-फिफ्टी-
या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय सामना टी२०च्या रुपाने झाला. २० डिसेंबर २०१२ रोजी भारतीय संघ या मैदानावर प्रथमच इंग्लंड संघासोबत सामना खेळला होता. भारतीय संघाचा त्यात ५ विकेट्सने पराभव झाला होता. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०१६ला भारताने टी२० सामन्यात याच मैदानावर लंकेचा पराभव केला होता.
वन-डेत भारतच येथे किंग-
भारताने या मैदानावर ३ वन-डे सामने खेळले असुन त्यात २ विजय तर १ पराभव संघाला पहावा लागला आहे. १३ आॅक्टोबर २०१३ रोजी झालेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारताचा ७२ धावांनी मोठा पराभव केला होता. त्यानंतर मात्र भारतीय संघ येथे पराभूत झालेला नाही.
जानेवारी २०१७मध्ये याच मैदानावर टीम इंडियाने इयान माॅर्गनच्या इंग्लंड संघाला ३ विकेट्सने पाणी पाजले होते. यात लोकल बाॅय केदार जाधवने चमकदार कामगिरी करताना कर्णधार कोहलीला चांगली साथ दिली होती. कोहलीने त्या सामन्यात १२२ तर केदारने १२० धावा केल्या होत्या.
A second ODI century for Kedar Jadhav and he's done it at his home ground! #IndvEng pic.twitter.com/4jFM1CON9l
— ICC (@ICC) January 15, 2017
२५ आक्टोबर २०१७ रोजी भारतीय संघ येथे शेवटचा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना खेळला आहे. त्यात संघाने न्युझीलंड संघाचा ६ विकेट्सने पराभव केला होता.
कसोटीत मात्र पराभव-
एकाच वर्षात पुण्याच्या या स्टेडियमला तब्बल ३ आंतरराष्ट्रीय सामने आयोजीत करण्याचा सन्मान मिळाला ते वर्ष म्हणजे २०१७. गेल्या १० वर्षांत आॅस्ट्रेलिया संघाला भारतात १२ सामन्यात केवळ १ विजय मिळवता आला. आणि तो विजय हा २३ फेब्रुवारी २०१७ रोजी याच स्टेडियमवर स्टीव स्मिथच्या आॅस्ट्रेलियाने मिळवला होता. भारतीय संघ या मैदानावर आपला पहिला वन-डे, टी२० आणि कसोटी सामना पराभूत झाला आहे.
भारतीय संघाने या स्टेडियम एकूण ६ सामने खेळले असून त्यात विराटने ५ सामन्यात भाग घेतला आहे. सर्व सामन्यात मिळून त्याने ४१च्या सरासरीने २४६ धावा केल्या आहेत. या मैदानावर तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: भारतीय संघाची डोकेदुखी वाढली; रिषभ पंत झाला दुखापतग्रस्त
–मुंबई पोलिसांनी अनोख्या अंदाजात केले विराट कोहलीचे कौतुक
–भारताच्या या दिग्गजाने वतर्वले भविष्य; लवकरच विराट मोडणार सचिनचा हा विक्रम
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ड्वेन ब्रावोबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?