भारतीय हौशी कबड्डी महासंघ मान्यतेने व पश्चिम बंगाल स्टेट युनिट वतीने ४५ वी कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पश्चिम बंगाल, कोलकाता येथे आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र कुमार – कुमारी अंतिम संघाची घोषणा करण्यात आली आहे. शेलू-परभणी येथे झालेल्या ४५ व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून २० मुलांची (कुमार) व २० मुलींची (कुमारी) खेळाडूंची शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. या शिबिरातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रतिनिधीक संघाच्या अंतिम १२ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. कुमार गट संघाची धुरा तानाजी पाटील कडे तर कुमारी गट संघाचे नेतृत्व साक्षी रहाटे कडे असणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. ०८ फेब्रुवारी पासून शिवाजी पार्क, दादर याठिकाणी मुलाचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. तर मुलीचे सराव शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ मुंबई येथून कोलकाता येथे स्पर्धेसाठी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी रवाना झाला.
महाराष्ट्र कुमार गट संघ:
सौरभ तानाजी पाटील (कोल्हापूर), तेजस मारुती पाटील (कोल्हापूर), शुभम नितीन शेळके (पुणे), असलम मुस्ताफा इनामदार (ठाणे), राजू विजय कथोरे (ठाणे), राहुल रमेश सवर (पालघर), युवराज प्रकाश शिंदे (परभणी), पंकज दीपक मोहिते (मुंबई शहर), भरत विवेक करंगूटकर (मुंबई उपनगर), वैभव भाऊसाहेब गर्जे (बीड) ओंकार दीपक कुंभार (रत्नागिरी), तन्मय बाळकृष्ण चव्हाण (पुणे)
कर्णधार: सौरभ तानाजी पाटील
प्रशिक्षक: पठाण आयुबखान याकूबखान
व्यवस्थापक: लक्ष्मण गावंड
महाराष्ट्र कुमारी गट संघ:
साक्षी अनंत राहटे (मुंबई शहर), सोनाली रामचंद्र हेळवी (सातारा), मृणाली विलास टोणपे (कोल्हापूर), प्रतिक्षा जगदीश तांडेल (मुंबई शहर), वैष्णवी विनायक खाळदकर (सातारा), दिव्या दीपक सकपाळ (रत्नागिरी), राधा विलास मोरे (पुणे), तेजा महादेव सकपाळ (रायगड), लक्ष्मी रामदास गायकर (ठाणे), काजल बाळू खेरे (मुंबई उपनगर), जया रावसाहेब राऊत (अहमदनगर), कोमल रामकृष्ण लंगोटे ()
कर्णधार: साक्षी अनंत रहाटे
प्रशिक्षक: वीणा संदीप शेलाटकर
व्यवस्थापक: सारिका प्रभाकर जगताप