---Advertisement---

राज्य कुमार-कुमारी गट संघाचा मुं. उपनगर कबड्डी असोसिएशनकडून सत्कार, आज महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार रवाना.

On: मंगळवार, फेब्रुवारी 11, 2020 4:54 PM
---Advertisement---

मुंबई: रोहटक-हरियाना येथे होणाऱ्या ४६ व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ आज मुंबई इथून रवाना होतील. दिनांक १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२० दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने नंददीप विद्यालय, गोरेगाव येथे ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२० दरम्यान महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. काल शिबिराच्या शेवटच्या दिवशी सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंचा तसेच संघ प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांचा सत्कार करण्यात आला व संघाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी मुंबई उपनगर कबड्डीचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग, प्रमुख कार्यवाह रमेश हरियान, खजिनदार अजित शिंदे, पांडुरंग पार्टे, प्रताप शेट्टी, राजा पडेलकर, प्रवीण सावंत, आंतरराष्ट्रीय रेफेरी आरती भारी, संतोष रावराणे, जिग्नेश मोरे, अमित ताम्हणकर, राष्ट्रीय खेळाडु कोमल देवकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.

महाराष्ट्र कुमार-कुमारी गट संघ आज सायंकाळी ७ वाजता पंजाब मेलने छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस वरून स्पर्धेसाठी रवाना होईल.

महाराष्ट्र राज्य कुमार संघ

१) वैभव गर्जे – बीड (संघनायक)

२) तेजस पाटील – कोल्हापूर (उपसंघनायक)

३) परेश हारड – ठाणे

४) आकाश शिंदे – नाशिक

५) विघ्नेश पवार – मुंबई उपनगर

६) हर्ष लाड – मुंबई शहर

७) प्रथमेश निघोट – पुणे

८) विवेक जांभळे – रत्नागिरी

९) प्रतीक चव्हाण – रत्नागिरी

१०) गौरव पाटील – ठाणे

११) रोहित बिन्नीवाले – जालना

१२) कृष्णा राठोड – औरंगाबाद

प्रशिक्षक:- डॉ केतन गायकवाड (बीड)

व्यवस्थापक:- रविकिरण देशमुख (बीड)

महाराष्ट्र राज्य कुमारी संघ

१) मानसी रोडे – पुणे (संघनायिका)

२) समृद्धी कोळेकर – पुणे

३) दिव्या गोगावले – पुणे

४) आरती नांगरे – बीड

५) शीतल मेहेत्रे – बीड

६) सुवर्णा लोखंडे – औरंगाबाद

७) मृणाल टोणपे – कोल्हापूर

८) प्रतीक्षा तांडेल – मुंबई शहर

९) काजल खैरे -मुंबई उपनगर (उपसंघनायिका)

१०) हर्षा शेट्टी – पालघर

११) सविता शिंदे – अहमदनगर

१२) हरजितकौर संधू – मुंबई उपनगर.

प्रशिक्षिका:- शीतल मारणे-जाधव (पुणे)

व्यवस्थापिका:- राजश्री बंडागळे (मुंबई उपनगर)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---