सिन्नर येथे सुरू असलेल्या ६६ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काल दुसऱ्या दिवशी पुरुष विभागाचे ९ तर महिला विभागाचे १२ सामने खेळवण्यात आले.
पहिल्या सत्रात महिला विभागात मुंबई शहरने बीडला ६७-२५ असे सहज नमववले. प्रतिक्षा तांडेल व प्रियंका जेधे यांनी चांगला खेळ केला. कोल्हापूरने औरंगाबाद चा ५८-३१ असा पराभव केला. रत्नागिरी महिला संघाने सिंधुदुर्गचा ५९-०८ असा धुव्वा उडवला.
पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध नंदुरबार सामन्यात मुंबई शहर ३७-२६ अशी बाजी मारली. मुंबई कडून चढाईत अजिंक्य कापरे, सुशांत साईल, ओमकार जाधव यांनी चांगला खेळ केला. पकडीत विजय दिवेकर याने चांगला खेळ केला. उस्मानाबाद ने ६०-२९ असा नांदेड संघाच पराभव केला. तर परभणी विरुद्ध सातारा सामना ४४-४४ असा बरोबरीत राहिला.
महिला विभागात मुंबई उपनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई शहर, ठाणे याचा बाद फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. तर पुरूष विभागात पुणे, कोल्हापूर, रायगड संघाचे प्रवेश निश्चित झाले आहेत उर्वरीत संघाचे प्रवेश आज निश्चित होतील.
दुसऱ्या दिवसांचे पुरुषांचे ६ तर महिलांचे २ सामने आज खेळवण्यात येतील. “चला हवा येऊ द्या” मधील कलाकार भाऊ कदम व कुशल बद्रिके याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कालचे उरलेले व आजच्या सामने आज खेळवण्यात येतील. सर्व साखळी सामने आज पूर्ण होऊन बाद फेरीतील संघ निश्चित होतील.
दुसऱ्या दिवसाचे निकाल:
महिला विभाग:
१) कोल्हापूर ५८ विरुद्ध औरंगाबाद ३१
२) रत्नागिरी ५९ विरुद्ध सिधुदुर्ग ०८
३) मुंबई शहर ६७ विरुद्ध बीड २५
४) ठाणे विरुद्ध ३६ जालना १२
५) अहमदनगर ५५ विरुद्ध सोलापूर २०
६) सातारा ३६ विरुद्ध उस्मानाबाद ०६
७) कोल्हापूर ४९ विरुद्ध रायगड २५
८) रत्नागिरी ४६ विरुद्ध सांगली १७
९) मुंबई शहर ५६ विरुद्ध नाशिक १९
१०) ठाणे २२ विरुद्ध पालघर १७
११) औरंगाबाद ३८ विरुद्ध जळगाव २६
१२) सिंधुदुर्ग ३५ विरुद्ध धुळे २०
पुरुष विभाग:
१) नंदुरबार २६ विरुद्ध मुंबई शहर ३७
२) उस्मानाबाद ६० विरुद्ध नांदेड २९
३) पुणे ३९ विरुद्ध जालना २०
४) बीड ७५ विरुद्ध हिंगोली १४
५) कोल्हापूर ३१ विरुद्ध धुळे २२
६) पालघर ५२ विरुद्ध लातूर २६
७) सोलापूर ५० विरुद्ध नांदेड २३
८) ठाणे १८ विरुद्ध रायगड ३७
९) परभणी ४४ विरुद्ध सातारा ४४
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: कोरोच्या गैरहजेरीत जमशेदपूरकडून एफसी गोवा चीतपट
–तूम्ही जर रोहित फॅन असला तर ही आहे तुमच्यासाठी खास आकडेवारी
–धोनीवर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती