स्कूल गेम्स फेडरेअशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील मुले व मुलीचा महाराष्ट्र कबड्डी संघ १ जानेवारीला दिल्ली येथे रवाना झाला आहे. ६४ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत १९ वर्षाखालील महाराष्ट्र कबड्डी संघ सहभागी होत आहे. बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेतून निवडलेल्या संघ दिल्ली येथे महाराष्ट्र प्रतिनिधित्व करणार आहे.
१९ वर्षाखालील महाराष्ट्र मुलाचा संघ ६४ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी ‘अ’ गटात आहे. ‘अ’ गटात महाराष्ट्र सह दिल्ली व एन. व्ही. एस. हे दोन संघ आहेत. तर महाराष्ट्राचा मुलीचा संघ ‘ड’ गटात झारखंड व वेस्ट बंगाल हे दोन संघ आहेत. मुलाचे एकूण ३१ संघ सहभागी होणार असून त्याचे ८ गटात विभाजन केले आहे. तर मुलीचे २८ संघ सहभागी होणार असून त्याचे सुध्दा ८ गटात विभाजन केलं आहे.
३ ते ९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या यास्पर्धेत उद्यापासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होईल. सुरुवातीला साखळी सामने खेळवण्यात येतील त्यानंतर बादफेरीचे सामने होतील. १९ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या कबड्डी प्रशिक्षक म्हणून डॉ. केतन गायकवाड, प्रा.अनिल जगदाळे व प्रा.सुधा खोले या तिघांची निवड महाराष्ट्र कबड्डी राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे .
साखळी सामने १९ वर्षाखालील महाराष्ट्र मुले संघ:
१) महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली
२) महाराष्ट्र विरुद्ध एन. व्ही. एस.
साखळी सामने १९ वर्षाखालील महाराष्ट्र मुली संघ:
१) महाराष्ट्र विरुद्ध झारखंड
२) महाराष्ट्र विरुद्ध वेस्ट बंगाल
१९ वर्षाखालील महाराष्ट्र कबड्डी संघ (मुले): आकाश शिंदे, वैभव गर्ज, परेश हरड, प्रथमेश साळवी, तेजस पाटील, साहिल सांडभोर, अनिकेत तेवरे, यश लोखंडे, शुभम भीमटे, वैभव उगले, आदित्य गोरे, सचिन सातपुते
१९ वर्षाखालील महाराष्ट्र कबड्डी संघ (मुली): मानसी रोडे, शीतल मेहेत्रे, शर्वरी गोडसे, मृणाली टोणपे, प्रतीक्षा पिसे, आरती नांगरे, स्नेहल उपर्वट, संजना पोळ, संजना मोरे, जयश्री बुंदिले, राजकुंवर तपकीर, मंदिरा कोमकर