-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )
जालना । २०१८ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या जालना शहरात सुरु आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मातीमधील अनेक दिग्गज मल्ल आपले नशीब आजमावत आहे.
या स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठेची गोष्ट कोणती असेल तर चमचमणारी चांदीची गदा. ही गदा कुणाला मिळते यावर तमाम कुस्तीशौकीनांचे लक्ष लागलेले असते. असे असले तरी यावेळा मल्लांना एक खास भेट मिळणार आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पहिल्यांदाच जंबो पदक विजेत्या खेळाडूंना दिले जाणार आहेत. पहिलवान पदक असं या पदकाचं नामकरण करण्यात आलं असून सर्व विजेत्यांना हे पदक देण्यात येणार आहे
.
खेळाडूंना हे पदक सदैव आठवणीत राहतील असं त्याचं डिझाईन करण्यात आलं आहे. झुंज कुस्तीची महाराष्ट्र केसरी असं ब्रिद वाक्य असलेलं हे पदक महागडं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे
–मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…
–आॅस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी