-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा तालीम संघाच्यावतीने आणि राज्यमंत्री मा.ना. अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या 62 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून पहिलवानांची शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीमुळे जालना शहर कुस्तीमय झाले असून पाहिलवांनासह कुस्तीप्रेमी जालनेकरांनी जय बजरंगच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून सोडले होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष व राज्यमंत्री ना. अर्जुन खोतकर यांच्याहस्ते या मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला . मोटरसायकलच्या मागे ट्रॅक्टरांमध्ये पहिलवानांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ना.अर्जुन खोतकर, प्रा.डॉ. दयानंद भक्त, कार्याध्यक्ष संजय खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, युवा नेते अभिमन्यू खोतकर, शहरप्रमुख प्रा. डॉ. आत्मानंद भक्त, विष्णू पाचफुले, भाऊसाहेब घुगे, पांडुरंग डोंगरे देखील उघड्या जीपमध्ये उभे राहून या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
यावेळी ढोलताशे आणि हलगीच्या तालावर पहिलवांनासह कुस्तीप्रेमी जालनेकरांनी जय बजरंगच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून सोडले होते. पहिलवानांना पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
शहरातील आझाद मैदान येथून सुरू झालेली ही रॅली शिवाजी पुतळा, सराफा मार्केट, फुल बाजार, सिंधी बाजार, मामा चौक, महावीर चौक, सुभाष चौक, लोखंडी पुल, मंमादेवी मंदीर, गांधी चमन मार्गे संभाजी उद्यान येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत राज्यासह देशभरातील अनेक नामवंत मल्ल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आदींसह कुस्तीप्रेमी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकांच्यावतीने देण्यात आलेले ट्रॅकसुट्स परिधान करून ट्रॅक्टरवर उभे राहून ढोल ताशे आणि हलगीच्या तालावार ठेका धरत शहरवासीयांना अभिवादन करणारे एक से बढकर एक पिळदार शरीर असलेले मातब्बर मल्ल या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–महाराष्ट्र केसरी यशोगाथा २- कुस्तीगीरांचा कुुंभमेळ्यात डंका लालमातीचाही
–महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व
–महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- मोहोळ कुटुंबियाकडून सलग 35 व्या वर्षी गदेचे बक्षिस
–महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक...
–महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी