कर्जत-जामखेड येथे सुरु असलेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी गदेचे पुण्यात विधिवत पूजन करण्यात आले. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1983पासून मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने देण्यात येते.
मोहोळ यांच्या नवी पेठ येथील निवासस्थानी मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर गदेचे विधिवत पूजन माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधना नंतर त्याचे सुपुत्र माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ यांनी मामासाहेबांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरु केली .गेली 42वर्ष अव्याहतपणे मामासाहेब मोहोळ यांचे वंशज ही गदा स्वखर्चाने बनवून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करुन मामासाहेब मोहोळ यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
गदेच्या निर्मिती विषयी सांगताना संग्राम मोहोळ म्हणाले की यंदाची 17किलोची गदा असुन 34गेज जाड शुध्द चांदीचा पत्रा लावून कोरीव कामाची झळाळी गदेला देण्यात आली आहे. यदांची गदा मोठी आहे गदेच्या मध्यभागी स्व. मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसविण्यात आली असुन पेशवेकालीन कारागीर पानघंटी ही गदा गेली 42वर्ष बनवित आहेत. कर्जत-जामखेड येथे सुरु असलेल्या 66व्या महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत 30 मार्चला होत आहे, या दिवशी ही गदा नव्या विजेत्याला बहाल केली जाईल. कार्यक्रमाचे प्रास्तविक संग्राम मोहोळ यांनी तर आभार मुख्याध्यापक चंद्रकांत मोहोळ सर यांनी मानले.
या प्रसंगी पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम अशोक मोहोळ, कुणाल मोहोळ, अजिक्य मोहोळ, हिंद केसरी अमोल बराटे, शिवाजी तांगडे, सचिन हागवणे, प्रकाश मोरे, गणेश मोहोळ विक्रम मोहोळ आर्यन मोहोळ प्रकाश करपे आदी उपस्थित होते.