---Advertisement---

Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीचा प्रमुख दावेदार सिकंदर शेखचा धक्कादाक पराभव, विशाल बनकर विजयी

Sikandar Shekh prakash bankar
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साताऱ्यातील शाहू क्रीडा संकूलात या मानाच्या कुस्ती स्पर्धा पार पडत आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शनिवार (दिनांक ९ एप्रिल) रोजी झालेल्या उपांत्य आणि अंतिम फेरीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. ( Maharashtra Kesari 2022 )

शनिवारी माती विभागातून उपांत्या फेरीतून सिंकदर शेख आणि विशाल बनकर हे अंतिम फेरीत दाखल झाले होते. या दोघात माती विभागातील अंतिम फेरीची कुस्ती पार पडली. अतिशय अटितटीच्या झालेल्या या कुस्तीत महाराष्ट्र केसरीचा प्रमुख दावेदार मानला गेलेला सिकंदर शेख याचा धक्कादायक पराभव झाला.

माती विभागात प्रकाश बनकर याच्याकडून सिकंदर शेख याचा १३-१० अशा निसटत्या फरकाने पराभव झाला. अतिशय प्रेक्षणीय झालेल्या या कुस्तीत पैलवानांनी उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे अगदी पारणे फेडले.

या विजयासह आता विशाल बनकर गादी विभागातील अंतिम फेरीतील विजेता पृथ्वीराज पाटील याच्यासह महाराष्ट्र केसरी किताबसाठी लढणार आहे.

( Maharashtra Kesari Main Contender Sikandar Sheikh Shocking Defeat Vishal Bankar Won )

अधिक वाचा

GT vs PBKS| शेवटच्या दोन चेंडूवर षटकार लगावताच तेवातियाचा धोनी-जडेजाच्या खास क्लबमध्ये समावेश

Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील आतापर्यंतचे ९ धक्कादायक निकाल, वाचा एका क्लिकवर

आजवर ‘या’ मल्लांनी जिंकलीये महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा, पाहा संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---