बुधवारी (दि. 28 जून) महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा क्वालिफायर 2 सामना पार पडला. या सामन्यात पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघ आमने-सामने होते. या सामन्यादरम्यान अशी घटना पाहायला मिळाली, जी पाहून प्रत्येकजण हैराण झाला. कारण, एका क्लीन बोल्ड म्हणजेच त्रिफळाचीत बादच्या निर्णयासाठी तिसऱ्या पंचांकडे धाव घ्यावी लागली. फलंदाजाने जसा चेंडू मारला, पण बॅट-चेंडूचा संपर्क झाला नाही, त्यामुळे तसा त्याने वाईड चेंडूसाठी अपील केली. मात्र, बेल्स खाली पडल्यामुळे, सर्वांना वाटले की, फलंदाज त्रिफळाचीत बाद झाला होता.
नेमकं काय घडलं?
तर झालं असं की, कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी पॉवरप्ले संपल्यानंतर कोल्हापूरकडून तरणजीत सिंग ढिल्लन (Taranjitsingh Dhillon) सातवे षटक टाकण्यासाठी आला. तरणजीतने पुणेरी बाप्पाचा फलंदाज यश क्षीरसागर (Yash Kshirsagar) याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यशला तरणजीतचा फिरकी चेंडू खेळता आला नाही आणि चेंडू लेग स्टम्पला स्पर्श करुन गेला.
https://www.instagram.com/reel/CuCX_yBAaa6/
यादरम्यान फलंदाज ऑफ स्टम्प्सच्या बाहेर गेला आणि असे वागू लागला, जसे चेंडू वाईड दिला पाहिजे. कारण, त्याचा चेंडूशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता. मात्र, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी बादसाठी अपील केली. यावेळी पंचांनी बाद घोषित केले नाही. अशात तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली. यावेळी रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी फलंदाज यश क्षीरसागर याला बाद घोषित केले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
When clean bowled needed a 3rd umpire review ???? #MPL #MPLonFanCode pic.twitter.com/1YJQpdz5KC
— FanCode (@FanCode) June 28, 2023
एमपीएलचा अंतिम सामना
या सामन्यात कोल्हापूरने पुणेरी बाप्पा संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. पुण्याने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 133 धावा केल्या होत्या. हे आव्हान कोल्हापूरने 17.4 षटकात 134 धावा करून पूर्ण केले. अशाप्रकारे कोल्हापूर संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स (Kolhapur Tuskers vs Ratnagiri Jets) संघात गुरुवारी (दि. 29 जून) एमपीएल 2023 (MPL 2023) स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. (maharashtra premier league 2023 clean bowled needed a 3rd umpire review in mpl)
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप वेळापत्रकानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली! वाचा नक्की काय घडले?
बटलर सोडणार इंग्लंडची साथ? ‘या’ आयपीएल संघाकडून करोडोंची ऑफर, आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवणार?