क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी (दि. 13 जून) याची माहिती दिली. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी पार पडणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे खेळले जातील.
या स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत. त्यातील 15 साखळी सामने, तर उर्वरित 4 प्ले-ऑफचे सामने असतील. या स्पर्धेत प्रत्येक संघ प्रत्येकी 5 सामने खेळणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेत महिला क्रिकेटचे तीन प्रदर्शनीय सामनेही खेळवले जाणार आहेत.
एमएपीएलचे वेळापत्रक
महाराष्ट्र प्रीमिअर लीग (Maharashtra Premier League) स्पर्धेतील पहिला सामना 15 जून रोजी पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघात सायंकाळी 8 वाजता खेळला जाणार आहे. यानंतर स्पर्धेतील दुसरा आणि तिसरा सामना 16 जून रोजी खेळला जाणार आहे. या दिवशी प्रेक्षकांना डबल हेडर सामन्यांचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. या दिवशीच्या पहिल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स संघ आमने-सामने असतील. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल, तर दुसरा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स संघात सायंकाळी 8 वाजता खेळला जाईल.
स्पर्धेत एक दिवसाच्या अंतराने डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. 17 जून रोजी स्पर्धेचा चौथा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स संघात सायंकाळी 8 वाजता सुरू होईल. 18 जून रोजी पुन्हा डबल हेडर सामना खेळला जाईल. यात दुपारी पहिल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, तर सायंकाळच्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स संघ आमने-सामने असतील.
सातव्या सामन्यात 19 जून रोजी सायंकाळी 8 वाजता पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स भिडतील. त्यानंतर 20 जून रोजी आठवा सामना सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघात, तर नववा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स संघात पार पडेल. 21 जून रोजी सायंकाळी दहावा सामना ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स संघात खेळला जाईल. स्पर्धेचा 11वा सामना 22 जून रोजी छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघात आणि 12वा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स संघात खेळला जाईल.
यानंतर 23 जून रोजी 13व्या सामन्यात सायंकाळी सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. तसेच, स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या दिवशी म्हणजेच 24 जून रोजी 14वा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स संघात खेळला जाईल. साखळी फेरीचा शेवटचा 15वा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघात पार पडेल.
यानंतर 26 जून रोजी सायंकाळी 8 वाजता पहिला क्वालिफायर सामना, 27 जून रोजी एलिमिनेटर सामना आणि 28 जून रोजी क्वालिफायर 2 सामना खेळला जाईल. 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल.
विशेष म्हणजे, 25, 27 आणि 28 जून रोजी महिलांचे तीन प्रदर्शनीय सामनेही खेळवले जाणार आहेत. प्रत्येक सामना त्या-त्या दिवशी सकाळी 10 वाजता खेळला जाईल. (maharashtra premier league 2023 timetable out see mpl matches timings)
एमपीएलचे सामने आणि वेळा
1. 15 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
2. 16 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (दुपारी- 2 ते 5.20)
3. 16 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
4. 17 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
5. 18 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – 2 ते 5.20)
6. 18 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
7. 19 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
8. 20 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- 2 ते 5.20)
9. 20 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
10. 21 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
11. 22 जून- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – 2 ते 5.20)
12. 22 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
13. 23 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
14. 24 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – 2 ते 5.20)
15. 24 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
16. 25 जून- क्वालिफायर 1
17. 26 जून- एलिमिनेटर
18. 27 जून- क्वालिफायर 2
19. 29 जून- अंतिम सामना
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
MPL लिलावात रोहित पवारांची मोठी घोषणा, भारतीय क्रिकेटमध्ये प्रथमच घडणार ‘ही’ गोष्ट
MPL AUCTION: पहिल्याच लिलावात ही ‘पंचरत्ने’ झाली मालामाल, वाचा संपूर्ण यादी