कोल्हापूर, 8 जून, 2023 : पुनित बालन ग्रुपच्या मालकीच्या कोल्हापूर टस्कर्स संघाने आगामी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) साठी एक मजबूत संघ तयार करण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडलेली नाही. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या विद्यमाने आयोजित ही स्पर्धा 15 -29 जून 2023 या कालावधीत पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.
ऑफ-स्पिन गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला अष्टपैलू खेळाडू नौशाद शेख हा
स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोल्हापूर टस्कर्सने त्याला MPL लिलावात 6 लाखांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. स्फोटक फलंदाजी आणि धूर्त गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा नौशाद संघासाठी मैदानावर अष्टपैलू कामगिरी देण्यासाठी सज्ज झाला आहे.
केदार जाधवची कोल्हापूर टस्कर्सचा आयकॉन खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. जाधवचे नेतृत्वगुण आणि क्रिकेटचे अफाट ज्ञान संपूर्ण स्पर्धेत संघाला मार्गदर्शन आणि प्रेरणा देईल. त्याची उपस्थिती कोल्हापूर टस्कर्ससाठी महत्त्वाची आहे आणि त्याचा अनुभव संघाच्या यशाची महत्त्वपूर्ण संपत्ती ठरणार आहे.
नौशाद आणि जाधव यांच्या व्यतिरिक्त कोल्हापूर टस्कर्सने त्यांच्या संघाला बळकट बनवण्यासाठी कौशल्यपूर्ण खेळाडू निवडले आहेत. ऑफ-स्पिनर तरनजीत ढिल्लनला 1.6 लाखांच्या किमतीत संघात सामील केले आहे, ज्यामुळे गोलंदाजी आक्रमणात अचूक आली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 50 पेक्षा अधिक सरासरी असलेला उजव्या हाताचा फलंदाज अंकित बावणेला 2.8 लाखांमध्ये विकत घेण्यात आले आहे आणि त्याच्या मजबूत फलंदाजी तंत्रामुळे संघाच्या मधल्या फळीला स्थिरता मिळते.
55 पेक्षा जास्त सरासरी असलेला उजव्या हाताचा फलंदाज सचिन धस यालादेखील 1.5 लाखांमध्ये विकत घेण्यात आले आहे. स्ट्रोक खेळातील त्याची प्रवीणता त्याला संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत एक मौल्यवान संपत्ती बनवते. साहिल औताडे 3.8 लाखांना विकत घेतलेला प्रतिभावान यष्टिरक्षक-फलंदाज मधल्या फळीत पॉवर हिटिंग क्षमता आणतो. तो खेळाची गती बदलण्यास सक्षम आहे.
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्सचा सहभाग हा पुनित बालन ग्रुपच्या देशातील विविध खेळांना प्रोत्साहन आणि वचनबद्धतेचा पुरावा आहे. अल्टीमेट टेबल टेनिस, प्रो पंजा लीग, प्रीमिअर हँडबॉल लीग, प्रीमिअर बॅडमिंटन लीग, अल्टीमेट खो खो, टेनिस प्रीमिअर लीग आणि मोटोक्रॉसमध्ये आधीच स्थापन केलेल्या फ्रँचायझींसह, पुनित बालन ग्रुप भारतातील ऑलिम्पिक क्रीडा चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. . कोल्हापूर टस्कर्सच्या समावेशामुळे विविध क्रीडा शाखांमध्ये सर्वोत्तम प्रतिभा दाखविण्याची त्यांची वचनबद्धता आणखी मजबूत झाली आहे.
संघाच्या क्षमतेबद्दल आपला उत्साह आणि आत्मविश्वास व्यक्त करताना, कोल्हापूर टस्कर्सचे मालक आणि पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष- व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन म्हणाले, “आम्ही MPL टी20 क्रिकेट स्पर्धेचा भाग बनून आनंदी आहोत. कोल्हापूर टस्कर्समध्ये विजयी होण्याची क्षमता आहे, असा मला ठाम विश्वास आहे. आम्ही स्पर्धेसाठी एक मजबूत आणि प्रतिभावान संघ तयार केला आहे. आमच्या संघात जबरदस्त समर्पण आणि प्रतिभा दाखवलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. आम्हाला विश्वास आहे की त्यांचा फ्रॅंचायझी आणि चाहत्यांना अभिमान वाटेल.”
कोल्हापूर टस्कर्स एमपीएलमधील इतर नामांकित फ्रँचायझींच्या कठोर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. क्रिकेट रसिक आणि चाहत्यांना कोल्हापूर टस्कर्सच्या रूपात क्रिकेटच्या तेजस्वी प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
*संघ:*
केदार जाधव (आयकॉन खेळाडू)
नौशाद शेख (रु. 6 लाख)
साहिल औताडे (3,80,000 लाख)
अंकित बावणे (2,80,000 लाख)
तरनजीत ढिल्लन (1,60,00)
सचिन धस (1,50,000)
श्रेयश चव्हाण (90,000)
कीर्तीराज वाडेकर (20,000)
अक्षय दरेकर (80,000)
मनोज यादव (60,000)
विद्या तिवारी (60,000)
सिद्धार्थ म्हात्रे (60,000)
आत्मन पोरे (20,000)
निहाल तुसामद (20,000)
रवी चौधरी (20,000)
निखिल मदास (20,000)
(Maharashtra Premier League MPL Kolhapur Tuskers Sqaud)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट