महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले अजून २५ नोव्हेंबर रोजी २ पदांसाठी निवडणूक होईल. अध्यक्षपदासह १४ पदाची बिनविरोध निवड झाली आहे. कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदासाठी निवडुक होईल.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी १६ पदासाठी ७१ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज अजितदादा पवार यांनी दाखल केला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा अजितदादा पवार यांच्याकडे असणार आहे.
अर्ज माघारी नंतर उपाध्यक्ष पदासाठी ४ पुरुष व २ महिलांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सरसहकार्यवाह पदासाठी पुन्हा एकदा रायगडचे आस्वाद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सहकार्यवाह पदांसाठी ४ पुरुष व २ महिलांची बिनविरोध निवड झाली आहे. तर कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष या दोन पदांसाठी २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होईल.
कार्याध्यक्ष पदासाठी दत्ताभाऊ पार्थिकर (औरंगाबाद) व गजानन कीर्तिकर (उपनगर) यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर कोषाध्यक्ष पदासाठी रमेश भेंडीगिरी (कोल्हापूर) व मंगल पांडे (परभणी) हे एकमेकांसमोर असतील. २५ नोव्हेंबर रोजी निवडणुकी नंतर निकाल जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पदे:
बिनविरोध निवड झालेली पदे
अध्यक्ष-
१)अजितदादा पवार (पुणे)
उपाध्यक्ष-
१) देवराम भोईर (ठाणे)
२) अमरसिंह पंडित (बीड)
३) शशिकांत गाडे (अहमदनगर)
४) दिनकर पाटील ( सांगली)
महिला राखीव पद उपाध्यक्ष-
१) शकुंतला खटावकर (पुणे)
२) नेत्रा राजेशिर्के (रत्नागिरी)
सरसहकार्यवाह-
१) आस्वाद पाटील (रायगड)
सहकार्यवाह-
१) मदन गायकवाड (सोलापूर)
२) मोहन गायकवाड (नाशिक)
३) रवींद्र देसाई (रत्नागिरी)
४) महादेव साठे (उस्मानाबाद)
महिलांसाठी राखीव सहकार्यवाह-
१) सयदा पटेल (नांदेड)
२) स्मिता पाटील ( परभणी)
दोन पदासाठी होणार निवडणूक-
कार्याध्यक्ष १ पदासाठी उमेदवार-
दत्ताभाऊ पार्थिकर (औरंगाबाद)
गजानन कीर्तिकर ( उपनगर)
कोषाध्यक्ष १ पदासाठी उमेदवार-
रमेश भेंडीगिरी (कोल्हापूर)
मंगल पांडे (परभणी)
वाचा महत्त्वाच्या बातम्या-
–तीन मॅचमध्ये ५३८ धावा करणाऱ्या १६ वर्षीय खेळाडूला रैनाकडून गाॅगल भेट
–२०११विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील ३ खेळाडू आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत करणार समालोचन
–एबी डिव्हिलियर्सच्या पुनरागमानाबद्दलच हे आहे मोठे वृत्त
–Breaking- पहिल्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या १२ खेळाडूंच्या नावाची घोषणा






