झारखंडची राजधानी रांची येथे १५ वर्षांखालील फ्री स्टाईल मुलींच्या कुस्ती स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा महिला कुस्तीपटूंनी जोर दाखवला आहे. या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत श्रावणी लवटे आणि अहिल्या शिंदे यांनी सुवर्ण पदक पटकावले. तसेच, महाराष्ट्र संघाला सांघिक तृतीय विजेतेपदाचा मानकरीही बनवले.
पदकविजेते कुस्तीगीर खालील प्रमाणे-
३३ किलो -कस्तुरी कदम – ( कास्यपदक ) माळ्याची शिरोली कोल्हापूर येथे पै नितीन पाटील सर यांचा कडून प्रशिक्षण घेते.
३६ किलो – श्रावणी लवटे ( सुवर्णपदक ) NIS कुस्ती केंद्र दोनवडे कोल्हापूर पै संदीप पाटील यांच्या कडून प्रशिक्षण घेते.
४२ किलो – ऋतुजा गुरव ( रौप्य पदक ) कोल्हापूर , पै. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
४६ किलो – संजीवनी ढाणे ( कास्यपदक ) सोलापुर ढाणे वस्ताद. यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
५० किलो – अहिल्या शिंदे ( सुवर्णपदक ) मारकड कुस्ती केंद्र इंदापूर पै . मारुती मारकड सर. यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
५८ किलो समृद्धी कारंडे ( कास्य पदक ) शिवछत्रपती कुस्ती संकुल मांजरी पै सत्यवान सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
६२ किलो आयुष्का गादेकर ( कास्यपदक ) भारतीय खेळ प्राधिकरण मुंबई साई पै अजय सिंग व पै अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंधरा वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ओंकार शिंदे व सोहम कुंभार यांची ‘सुवर्ण’ कामगिरी
पुण्याचा धीरज लांडगे करणार राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
सतरा वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला ८ पदके; दोन मल्लांची ‘सुवर्ण’ कामगिरी