नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. आता झारखंड राज्याची राजधानी रांची येथे १७ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा शुक्रवारी (१५ एप्रिल) पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूंनी जोर दाखवला आहे.
पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाला १सुवर्ण पदक व ३कास्य पदके मिळाली आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री संदीप पटारे, श्री संदीप पाटील, श्री बालाजी बुरूंगे यांनी काम पाहिले.
महाराष्ट्राच्या संघातील पहिल्या दिवसाचे पदक विजेते खालील प्रमाणे :-
१. सुवर्ण पदक :- ४५ किलो सिद्धनाथ पाटील (एन आय एस कुस्ती केंद्र दोनवडे. कोल्हापूर पै संदीप पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.)
२. कांस्य पदक :- ५२ किलो समर्थ म्हाकवे (पट्टण कोडोली कोल्हापूर येथे सोमनाथ सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.)
३. कांस्य पदक :- ५५ किलो महादेव माने (सह्याद्री कुस्ती संकुल. पै. विजय बराटे सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.)
४. कांस्य पदक :- ६० किलो हर्षवर्धन खांडेकर (क्रीडा प्रबोधनी कोल्हापूर पै कृष्णात पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.)
महत्त्वाच्या बातम्या –
‘महाराष्ट्र केसरी’ जिंकणाऱ्या पैलवानाबाबत जे घडलंय ते आख्ख्या राज्यासाठी लज्जास्पद!
Maharashtra Kesari | पृथ्वीराज पाटील नवा ‘महाराष्ट्र केसरी’, जिंकली मानाची गदा! विशाल बनकर पराभूत






